आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता एक दिवसापूर्वीही करता येणार तात्काळ तिकिटाचे बुकिंग; 13% सीट अँपसाठी राखीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोबाईल अॅपद्वारे काढण्यात येणाऱ्या तिकिटावर कमीत कमी एका प्रवाशांचा ओळख क्रमांक नमूद केलेला असेल. - Divya Marathi
मोबाईल अॅपद्वारे काढण्यात येणाऱ्या तिकिटावर कमीत कमी एका प्रवाशांचा ओळख क्रमांक नमूद केलेला असेल.
नवी दिल्ली- तात्काळ तिकिट यापूर्वी केवळ दोन दिवसापूर्वीच बुक करता यायचे. आता मात्र तात्काळ तिकिट एक दिवसापूर्वीही बुक करता येणार आहे. अँपवरुन तिकिट काढणाऱ्यांसाठी आता 13 टक्के तिकिटे राखीव ठेवण्यात येणार आहेत. शनिवारी काही रेल्वेगाड्यांसाठी याची चाचणीही घेण्यात आली. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या रेल्वेगाड्यांसाठी ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की ही योजना यशस्वी ठरली तर 20 टक्के जागा या अँपद्वारे बुकिंगसाठी राखीव ठेवण्यात येतील.   
 
एका प्रवाशाचे ओळखपत्र गरजेचे
- मोबाईल अँपवरुन काढण्यात येणाऱ्या तात्काळ तिकिटासाठी प्रवाशांपैकी एकाचे ओळखपत्र गरजेचे आहे. प्रवाशाला प्रवासादरम्यान आपले हे मूळ ओळखपत्र बरोबर ठेवावे लागणार आहे. हे ओळखपत्र नसल्यास दंड आकारण्यात येणार आहे.
- AC साठी सकाळी 10 ते 11 या वेळेत तात्काळ तिकिट काढता येणार आहे. नॉन AC साठी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत तिकिट काढता येईल. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...