आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेसाठी दिवाळी तोट्याची; सणासुदीत प्रवाशांनी फिरवली पाठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आर्थिक सुस्तीचा परिणाम म्हणा किंवा अन्य कुठले कारण. भारतीय रेल्वेसाठी यंदाचा सीझन आतबट्याचाच ठरला आहे. रेल्वेने दुर्गापूजा, दसरा, ईद, दिवाळीच्या निमित्ताने 31 ठिकाणांवरून तब्बल 2332 विशेष गाड्या सोडल्या. तरीही यंदा रेल्वेला या सणावाराच्या काळात अपेक्षित वाढीव उत्पन्न मिळाले नाही. दरवाढीनंतरही यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी उत्पन्न मिळाल्याने रेल्वे अधिकारी चिंताक्रांत आहेत.

दसरा - दिवाळीच्या काळात रेल्वेच्या उत्पन्नाचे जे काही आकडे आले आहेत, त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांचा उत्साह मावळला आहे. रेल्वेला प्रवाशांची गर्दी पूर्वीसारखीच असली तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेच्या तिकिटांची कमी विक्री होत आहे.तिकीट विक्रीत घट झाल्याची अधिकार्‍यांकडून अनेक कारणे सांगितली जात आहेत. परंतु गैरसोय, सोयीसुविधा, सुरक्षेचा अभाव आणि शेळ्यामेंढय़ांप्रमाणे प्रवास करण्याचे लोक टाळत आहेत. उत्तर रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, यंदा दसरा, दिवाळीच्या आसपास अराखीव तिकिटांच्या (यूटीएस) विक्रीत 4 टक्क्यांची घट झाली. गेल्यावर्षी अराखीव तिकिटांच्या विक्रीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली होती. अर्थात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा विशेष गाड्या सुरू करणे व नियमितपणे चालणार्‍या गाड्यांना जादा डबे जोडण्याच्या सकरात्मक परिणाम दिसून आला. राखीव (पीआरएस)तिकिटांच्या विक्रीत 6.93 टक्क्यांनी वाढली. परंतु यूटीएस व पीआरएस अशा दोन्ही प्रकारांतील तिकिट विक्रीचे आकडे एकत्र केले तर प्रवाशांच्या संख्येत एकूण 0: 50 टक्क्यांची घट नोंदवली गेली.

जास्त गाड्या सोडून, डबे वाढवूनही दसरा - दिवाळीच्या काळात गतवर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्येत मोठी घट

जनरल डब्यांतून प्रवास करण्याऐवजी प्रवाशांचे प्राधान्य रिझव्र्हेशनला

रिझर्व्हेशन न मिळाल्यास इतर पर्यायांचा अवलंब किंवा गावी जाण्याचा बेतच रद्द.

रेल्वेचे उत्पन्न घटले
कमी तिकीट विक्रीचा अर्थ यंदा रेल्वेचे उत्पन्न घटले आहे, असा होतो. गेल्या सहा महिन्यांतील रेल्वेच्या उत्पन्नाचे आकडे फारसे समाधानकारक नाहीत. दिल्लीसह विविध शहरांत राहणारे लोक आता सणासुदीच्या काळात गावी जाण्यासाठी रेल्वेऐवजी इतर पर्यायांचा अवलंब करत आहेत. या शिवाय धकाधकी व कामाच्या व्यापामुळे लोक पूजाविधी काळात गावी जाण्याऐवजी शहरात राहूनच सण - समारंभ साजरे करतात. याआधी सण, उत्सवांच्या काळात यूटीएस तिकिटांची विक्री 50 ते 60 टक्क्यांनी वाढत असे. ती बाब लक्षात घेऊनच रेल्वे पुढील वर्षीचे त्या - त्या महिन्यातील नियोजन करते. यंदा रेल्वेने दिल्लीतून 31 शहरांसाठी 2332 विशेष गाड्या चालवल्या. यात जनरल डब्यांची संख्याही वाढवली. अनेक ठिकाणी यूटीएस काउंटर सुरू करण्यात आले. तरीही रेल्वेला अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही.