नवी दिल्ली - रेल्वे भाडेवाढीमुळे देशभर नाराजी व्यक्त होत असताना इंधनाचे दर कमी झाले तर या भाडेवाढीचा फेरआढावा घेतला जाईल, असे आश्वासन रेल्वे मंत्रालयाने दिले आहे.
रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनीही यापूर्वीच्या यूपीए सरकारने रेल्वे भाडेवाढीसंदर्भात केलेल्या शिफारशी विद्यमान केंद्र सरकारने लागू केल्या असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच प्रसिद्धिपत्रकही मंत्रालयाने काढले आहे.
जागतिक दर्जा हवा ना!
रेल्वेला जागतिक दर्जा देण्याच्या दृष्टीने भाडेवाढीचा निर्णय कठोर असला तरी तो योग्य आहे, अशा शब्दांत अर्थमंत्री जेटली यांनी भाडेवाढीचे समर्थन केले.