आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Minister Sadananda Gowdas Son Booked After Actress Accuses Him Of Cheating Her

रेल्वे मंत्र्यांच्या मुलाने लग्नाचे आमीष दाखवून रेप केल्याचा कन्नड अभिनेत्रीचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : सदानंद गौडा यांचा मुलगा कार्तिकवर बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप करणारी अभिनेत्री मैत्रेयी)

बेंगळुरू - कन्नड अभिनेत्री मैत्रेयी हिने रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांचा मुलगा कार्तिकवर लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. कार्तिकने आधी तिच्याशी विवाह केला, पण नंतर विश्वासघात केल्याचा दावाही मैत्रेयीने केला आहे. बेंगळुरू पोलिसांनी कार्तिकवर धोकेबाजी, अत्याचार आणि आमीष दाखवून शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार दाखल केली आहे.
मैत्रेयीने तक्रारीत म्हटले आहे की, कार्तिकने बुधवारी दुस-या महिलेबरोबर साखरपुडा केला. पण त्याने आधीच माझ्याबरोबर विवाह केला होता. कार्तिक यांच्या आईने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. तर रेल्वेमंत्री गौडा यांनी मैत्रेयी आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा दावा केला आहे. हा आपल्या कुटुंबाच्या विरोधात कट असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तर मैत्रेयी यांच्या आई म्हणाल्या की, कार्तिक माझ्या मुलीचा विश्वासघात करेल हे मला आधीच माहिती होते. आपण मे महिन्यापासून कार्तिकला ओळखत असल्याचे मैत्रेयीने सांगितले. तसेच तिच्या कुटुंबीयांनाही त्याबाबत माहिती होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा मैत्रेयीचे काही फोटो...