आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Minister Suresh Prabhu Commented On Railway Situation

अधिकाऱ्यांच्या उधळपट्टीवर प्रभूंचा चाबूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रेल्वे प्रवाशांमध्ये दिवसेंदिवस वाढ हाेत असूनही रेल्वेची तिजाेरी मात्र रिकामीच अाहे. याला एकमात्र कारण अाहे ते म्हणजे, अधिकाऱ्यांच्या महागाई अाणि प्रवास भत्त्यांवर हाेणारा अनाठायी खर्च!. यास कात्री लावून यातील १० टक्के रकमेची बचत करा, असे फर्मान रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काढले अाहे. रेल्वेमधील १० लाखांवर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन अायाेग लागू केला तर दरवर्षी ३० हजार काेटी रुपयांपेक्षा जास्तीचा बाेजा रेल्वेवर पडणार अाहे.
रेल्वेत प्रवाशांना सुविधा चांगल्या मिळतात, स्वच्छता अाहे; परंतु विशेष भाडे वाढ झाली नसल्याने येणाऱ्या महसुलात अपेक्षित वाढ दिसून येत नसल्याचे प्रभू यांचे मत अाहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान माेदी आणि प्रभू यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खर्चावर निर्बंध अाणले अाहेत.