आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Need 100 Billions Dollar For Various Schemes

रेल्वेला योजनांसाठी १०० अब्ज डॉलरची गरज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय रेल्वे सेवेचा कायापालट करण्यासाठी रेल्वेला पुढील तीन ते चार वर्षांत सुमारे १०० अब्ज डॉलरपेक्षा (६,१५० अब्ज) जास्त रकमेची गरज आहे.त्यादृष्टीने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी रेल्वे विविध योजनांवर काम करत आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. पैशाअभावी रेल्वेच्या अनेक योजना रखडल्या आहेत.
घोषणा होऊनही अनेक योजना सुरू होऊ शकल्या नाहीत. त्या पूर्ण करायच्या असतील तर रेल्वेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक खेचून आणावी लागेल, असे प्रभू म्हणाले. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, पुढील तीन वर्षांत रेल्वेत शक्य तितकी गुंतवणूक खेचून आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी योजना तयार केल्या जात असून निधीचे स्त्रोत तपासून पाहिले जात आहेत.