आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता रेल्वेही करणार प्रवाशांसाठी ‘वेटिंग’, तिकिट खरेदीपर्यंत थांबणार स्थानकावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तिकीट खिडकीवर मोठी गर्दी असल्यामुळे वेळेवर तिकीट मिळाले नाही तर रेल्वे जाण्याची भीती बाळगण्याचे आता कारण नाही. कारण तसे झाल्यास आता खुद्द रेल्वेच प्रवाशांची प्रतीक्षा करेल! रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांची तिकीट खरेदी होईपर्यंत रेल्वे स्थानकावरच उभी असेल. ही स्वप्नकथा नाही, तर जनरल डब्यातून प्रवास करणार्‍यांसाठी या प्रकारच्या सुविधेवर रेल्वे प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे.


रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अरुणेंद्रकुमार यांनी माध्यमांना सांगितले की, रिझव्र्हेशन नसलेल्या तिकिटावर कमी पल्ल्याचा प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी सुविधांत वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यंदाच्या वित्तवर्षातील पहिल्या सहा महिन्यांत प्रवाशांच्या घटलेल्या आकड्यामुळे रेल्वेला मोठा तोटा झाला आहे. यामुळे रेल्वेकडून हे पाऊल उचलले जात आहे. तिकीट खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रवाशाला रांगेत दहा मिनिटांपेक्षा अधिक वेळ ताटकळत उभे राहण्याची वेळ येऊ नये, असा रेल्वेचा प्रयत्न आहे. यापेक्षा अधिक वेळ लागत असेल तर प्रवाशांसह खुद्द रेल्वेचेच मोठे नुकसान होते.


सुट्या पैशांचा प्रश्न
कुमार म्हणाले की, नव्या यंत्रांमुळे तिकीट काही सेकंदांतच मिळते. मात्र पैसे घेणे, मोजणे व उरलेले पैसे परत करण्यातच अधिक वेळ वाया जातो. यामुळे तिकीट खिडक्या वाढवणे, सणासुदीच्या दिवसांत काउंटरवर प्रमुख शहरांचे भाडे ठळक अक्षरांत लिहिण्याची व्यवस्था केली जाईल. प्रवासभाड्याचे नेमके पैसे देण्याचे आवाहन प्रवाशांना केले जाईल. सुट्या पैशांसाठी स्वतंत्र काउंटर सुरू करण्याबाबतही विचार केला जाऊ शकतो.