आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत हरवलेले सामान आता मिळणार परत, मौल्यवान सामानाचा विमाही मिळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रेल्वेत आपले हरवलेले सामान आता परत मिळू शकेल. यासाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. रेल्वेच्या संकेतस्थळावर तुम्हाला स्वत: हे सामान शोधण्याची सुविधा दिली जाणार आहे. त्याचबरोबर प्रवासी आपल्या महागड्या इतर सामानाचा विमा देखील करु शकतील.

दोन्ही पर्यायांवर रेल्वे मंडळ आणि आयआरसीटीसीचे अधिकारी विचार विनिमय करत आहेत. यापूर्वी आयआरसीटीसीने रेल्वे बोर्डाच्या सल्ल्यावर ऑनलाईन तिकीटांवर प्रवाशांना ९२ पैसे, दिवाळीपर्यँत केवळ १ पैशात दहा लाखा रुपयांपर्यंतच्या वीम्याचा पर्याय दिला आहे. १ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या या योजनेंअंतर्गत १५ ऑक्टोंबरपर्यंत १.५ कोटी प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतलेला आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी अशातच अधिकाऱ्यांना सल्ला दिला आहे की, प्रवाशांचे हरविलेले सामान शोधण्यासाठी एक पध्दत तयार करावी. याप्रकरणी ज्यांच्या सामानाची चोरी झालेली नाही आणि प्रवाशांचे सामान रेल्वेतच राहून गेलेले आहे. त्यास परत करावे यासाठी रेल्वेत हरवलेल्या सामानासाठी खास वेबसाईट बनविली जाईल. जिथे प्रवासी आपले राहीलेले सामान शोधू-पाहू शकतील. प्रवासादरम्यान सामानाची चोरी झाल्यास त्याचा यापुढे वीमा हा केलेला असेलच. भरपाईही मिळेलच.त्यामुळे रेल्वे प्रवासातील गैरसोय टळणार आहे.

जगातील सर्वात स्वस्त वाहतूक विमा
रेल्वेने वाहतुकीसाठी तीन विमा कंपन्यांची निवड केली आहे. त्यात श्रीराम जनरल, आयसीआयसीआय लॉम्बार्ड, रॉयल सुंदरम या कंपन्यांची सेवा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही जगातील सर्वात स्वस्त विमा सुविधा ठरली असल्याचे सांगण्यात येते. ९२ पैश्यांमध्ये १० लाखांपर्यंतचा विमा लागू आहे. दरवर्षी रेल्वे अपघातात सरासरी १५ हजार लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या विम्याचे संरक्षण नागरिकांना मिळणे महत्वाचे ठरते.
बातम्या आणखी आहेत...