आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे बोर्डावर याआधीही अधिकार्‍यांच्या मनमानी नियुक्त्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मनपसंत उमेदवारांची रेल्वे बोर्डावर वर्णी लावण्यासाठी नियमांची पायमल्ली करण्याचा प्रकार या विभागात पहिल्यांदाच घडलेला नाही. बोर्डावरील नियुक्त्यांसाठी लाचखोरीप्रकरणी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांना तर राजीनामा देऊन पायउतार व्हावे लागले. परंतु चौकशी झाली तर इतर अनेक नेते यात अडकू शकतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2003 मध्ये नितीशकुमार रेल्वेमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक अधिकार्‍यांना डावलून आर. के. सिंह यांना रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले होते. त्यांच्याकडे या पदासाठी आवश्यक असणारा ओपन - लाइन जनरल मॅनेजरचा अनुभव नव्हता. सेवाज्येष्ठतेच्या निकषावर हे पद त्यांना दिले गेले. 2004 मध्ये लालूप्रसाद यादव यांच्या काळात आर. एस. वार्ष्णेय यांनाही अनेक ज्येष्ठ अधिकार्‍यांना डावलून नियुक्ती देण्यात आली होती. त्यांच्या काळात नियम डावलून आर. आर. भंडारी यांना मेंबर मेकॅनिकल बनवले गेले होते. ममता बॅनर्जी यांच्या काळात व्ही. के. कौल तसेच विवेक सहाय आदी अधिकार्‍यांना इतरांची सेवाज्येष्ठता डावलून करण्यात आलेली नियुक्तीही वादग्रस्त ठरली आहे. धकार्‍यांच्या मनमानी नियुक्त्या