आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमात बदल : रेल्वेचे तिकीट आरक्षण चार वरुन आता दोन महिन्यांवर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रेल्वे प्रशासनाने आरक्षणाच्या नियमात बदल केला आहे. आता, दोन महिने आधी आरक्षण करता येणार आहे. यापूर्वी चार महिनेआधी आरक्षण करता येत होते. दलाली रोखण्यासाठी आणि रेल्वे आरक्षणात परदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. नव्या नियमाची अंमलबजावणी 1 मे पासून केली जाणार आहे.

लांबच्या प्रवासासाठी भारतीय रेल्वे प्रवासासाठी मोठी गर्दी असते. तसेच लोक रेल्वेनेच देशभर पयर्टनासाठी प्रवास करतात. त्यामुळे अशा तिकीटासाठी मोठी प्रतिक्षायादी असते. अशा प्रवासासाठी याआधी चार महिने आधी तिकीटे बुक करता येत होती. मात्र यात मोठा भ्रष्टाचार व दलाली होत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आले होते. त्यातच भारतीय रेल्वे सध्या तोट्याच्या गर्तेत आहे. अशावेळी तिकीट दर वाढविण्याचा विचार रेल्वे करीत आहे. त्यामुळे रेल्वे आपल्या सेवेत असलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच दलालाद्वारे तिकीटाची होणारी विक्री व रेल्वेतील काही लोक दलालांना पोसत असल्याचे खासगीत बोलले जाते. अशावेळी बुकिंग कालावधी चार महिन्यांवरुन दोन महिन्यांवर आणण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.