आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे भाडेवाढ त्वरित मागे घेण्याची काँग्रेसची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सामान्य नागरिक महागाईने पोळले जात असताना केंद्र सरकारने रेल्वे भाडेवाढ करून त्यांना आणखी एक धक्का दिला आहे. त्यामुळे ही भाडेवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेसने बुधवारी केली.

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला म्हणाले की, रेल्वेची भाडेवाढ ही मोदी सरकारने सणासुदीच्या दिवसांत दिलेली भेट आहे. या भाडेवाढीमुळे आधीच महागाईने त्रस्त असलेले सामान्य नागरिक आणखी अडचणीत येतील. देशातील नागरिकांच्या खिशातून पैसे काढण्यासाठी मोदी सरकारने ही अवैध नफेखोरीची कल्पना लढवली आहे.

मध्यमवर्गीयांसाठी रेल्वेने प्रवास हा किफायतशीर पर्याय आहे. अशा प्रामाणिक मध्यमवर्गीय कुटुंबांच्या खिशातून हजार कोटी रुपये काढण्याचा हा प्रकार आहे. मोदी सरकारने आता आपली चूक मान्य करावी आणि हे ‘तुघलकी फर्मान’ मागे घ्यावे, अशी मागणी सुरजेवाला यांनी केली.
सुरजेवाला म्हणाले की, ‘सामान्य रेल्वे प्रवाशांची भाडेवाढ करण्यात आली आहे. प्रथम आणि एक्झिक्युटिव्ह श्रेणीतील प्रवाशांना मात्र त्यातून वगळण्यात आले आहे. त्यातून सुटाबुटातील मोदी सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे. काॅर्पोरेट जगताचे लाख १२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे, तर दुसरीकडे सामान्य नागरिकांवर भाडेवाढीचा बोजा लादण्यात आला आहे’, अशी टीकाही त्यांनी केली.

केंद्र सरकारने राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या रेल्वेगाड्यांच्या भाड्यात १० ते ५० टक्के दरवाढीची घोषणा केली आहे. ही भाडेवाढ सप्टेंबरपासून लागू होईल. त्यातून केंद्र सरकारला या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षा आहे.
बातम्या आणखी आहेत...