आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Railway To Take Action If Information Provided In Reservation Form Is Found Wrong

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्‍वे रिझर्व्‍हेशन करताना चुकीची माहिती दिल्‍यास तिकीट होईल रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- रेल्‍वेचे आरक्षण करताना फॉर्ममध्‍ये चुकीची माहिती दिल्‍यास कारवाई करण्‍याची तयारी रेल्‍वे प्रशासनाने सुरु केली आहे. चुकीची माहिती देणा-या प्रवाशांचे तिकीट रद्द करण्‍यात येईलच, शिवाय दंडही भरावा लागेल. सणासुदीच्‍या हंगामात याची अंमलबजावणी करण्‍यात येणार आहे.

रेल्‍वे आरक्षण करताना खिडकीवर फॉर्म भरुन द्यावा लागतो. त्‍यातील माहिती पडताळून घेण्‍यासाठी स्‍वतंत्र कर्मचा-याची नियुक्ती करण्‍यात येणार आहे. चुकीची माहिती देणा-या प्रवाशांकडून प्रवासाची पूर्ण रक्‍कम आणि दंड वसूल करण्‍यात येईल.

आरक्षण फॉर्मसोबत दिलेली माहिती पडताळण्‍यात येईल. त्‍यात दिलेले मोबाईल किंवा दूरध्‍वनी क्रमांकांवर फोन करुन कर्मचारी पत्त्याची खातरजमा करतील. पत्ता चुकीचा आढळल्‍यास तिकीट रद्द करण्‍यात येईल. प्रवास करताना या प्रवाशांना विनातिकीट म्‍हणून समजले जाईल आणि दंड वसूल करण्‍यात येईल.