आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्‍वे वाहतुकीचे जाळे विणणार - नितीन गडकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाला जगाच्या शिखरावर नेण्यासाठी उद्योग आणि शेती क्षेत्रात प्रगत होणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी दळणवळणाची व्यवस्था अत्यंत महत्त्वाची असल्याने देशांतर्गत रस्ते, महामार्ग आणि जलवाहतुकीमध्ये क्रांती घडविण्याचे स्वप्न मी पाहिले असल्याचे केंद्रीय रस्ते, महामार्ग आणि जहाज मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
नितीन गडकरी विकास कामाचा झंझावात असल्याची चुणूक आज पहिल्या दिवशीच दिसून आली. त्यांनी संसदेसमोरील परिवहन भवनात सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांच्या पदाची सुत्रे स्विकारली. या विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांसह परिचय करून घेत विभागातील विस्तारीत कामाचा प्राथमिक आढावा घेतला. त्यांनी सुत्रे स्वीकारली तेव्हा त्यांच्या पत्‍नी कांचन गडकरी, कन्या केतकी आणि या विभागाचे राज्यमंत्री किशन पाल उपस्थि होते. यावेळी माध्यमांशी बोलताना गडकरी म्हणाले, उद्योग आणि शेतीवर देशाचा विकास अवलंबून असतो. यासाठी पाणी, उर्जा, संचार आणि उत्तम वाहतूक व्यवस्था याबाबी महत्वाच्या आहेत. रस्ते, महामार्ग बांधण्याशिवाय मी जलवाहतुकीला प्राधान्य देणार आहे. कोणत्या नद्यांमधून वाहतुक सुरु करता येईल याचा येणार्‍या काळात आढावा घेणार आहोत. ठाणे-भिवंडी बायपास मार्गाच्या मंजुरीसाठी मी याच कक्षात आलो होतो आणि जगदिश टायटलर हे मंत्री होते. बीओटी तत्वावरील हा देशातील पहिला मार्ग ठरला.
राजनाथ सिंह यांनी पदभार स्वीकारला
भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. राजनाथ यांच्याकडे अंतर्गत सुरक्षेसह पाकिस्तान, चीन, बांगलादेश, नेपाळ आणि भूतान सीमारेषेच्या सुरक्षेचे काम आहे. राजनाथ यांच्यापुढे नक्षली हिंसाचार, दहशतवादी कारवाया, पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी रोखण्याचे आव्हान आहे.
‘पायाभूत प्रकल्पांना वेग आणू’
पायाभूत प्रकल्पांना वेगात मंजुरी देण्याचे आश्वासन पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले आहे. नरेंद्र मोदी सरकारला हरितगृह वायूच्या मुद्दय़ावर उद्योग जगताशी शत्रुत्व साधण्यात रस नाही. पायाभूत प्रकल्पांना वेगात मंजुरी देताना पर्यावरणाचेही रक्षण केले जाईल, असे जावडेकर म्हणाले. विकास प्रकल्पांच्या पर्यावरण मंजुर्‍या वेगात दिल्या जातील. नव्या यंत्रणेत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यानंतर त्यांना पासवर्ड दिला जाईल. या वेळी मंत्रालय आणि अर्जदारांमध्ये पारदर्शकता निर्माण केली जाईल, असे जावडेकर यांनी सांगितले. ऑनलाइन अर्ज वन क्षेत्रासाठी लागू केले जाणार आहेत. विकास आणि पर्यावरण रक्षण दोन्हीही शक्य आहे.
कॅबिनमध्ये गांधीजींसह मुखर्जी, उपाध्याय आणि वाजपेयींचा फोटो!
पदाची सूत्रे हाती घ्यायच्या आधीच नितीन गडकरी यांच्या कॅबिनमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाल उपाध्याय आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे छायाचित्र डाव्या बाजूच्या भिंतीवर रांगेत लावण्यात आले आहेत. उजव्या हातावरील भिंतीवर गडकरी यांच्या टेबलशेजारीच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मोठा फोटो टांगलेला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचाही फोटो या कॅबिनमध्ये असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोची प्रतीक्षा आहे.