आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Railway Travelling, Vehiclas Insurance Hiking From April

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे प्रवास, वाहन विमा एप्रिलपासून महागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ऐन एप्रिलच्या होरपळीत महागाईचा चटका आणखी तीव्र होणार आहे. पहिल्या तारखेपासून रेल्वे तिकिटासह वाहन विम्याचे दर महागणार आहेत.

यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात आरक्षण शुल्क, सुपरफास्ट रेल्वे आणि तत्काळ तिकिटांच्या शुल्कात मात्र दरवाढ घोषित करण्यात आली होती. वातानुकूलित श्रेणीतील आरक्षण शुल्क प्रतितिकीट 15 ते 25 रुपयांपर्यंत महागणार आहे. द्वितीय, स्लीपर श्रेणीचे आरक्षण शुल्क स्थिर आहे. स्लीपर आणि द्वितीय श्रेणीतील सुपरफास्ट तिकिटाचे दर 10 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. एसी तिकिटासाठी हा दर 15 ते 25 रुपयांदरम्यान असेल.

‘इर्डा’ने वाहन विम्याच्या प्रीमियममध्ये (थर्ड पार्टी) 20 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यास मंजुरी दिली. यामुळे दुचाकी, पॅसेंजर कार व व्यावसायिक वाहनांवरील थर्ड पार्टी वाहन विमा महागणार आहे.