आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे रिझर्व्हेशन फॉर्मवर \'ट्रान्सजेंडर\' कॅटेगरी; ऑनलाइन मिळेल सुविधा, स्वतंंत्र कोचची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रेल्वे रिझर्व्हेशन किंवा कॅन्सलेशन फॉर्मवर (ऑनलाइन अथवा काउंटर) आता महिला-पुरुष व्यतिरिक्त ट्रान्सजेडर कॅटेगरीचा नव्याने समावेश करण्यात येणार आहे. रेल्वेत प्रवासाची ट्रान्सजेंडर्स सुविधा मिळावी, यासाठी एका वकीलाने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकेवर न‍िर्णय देताना न्यायमूर्ती जी.रोहिणी यांनी रेल्वे मंत्रालयाला रिझर्व्हेशन फॉर्ममध्ये ट्रान्सजेडर कॅटगरी करण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी तृतीयपंथीयांना मिळाली होती सुविधा...
- बायनरी जेंडरशिवाय तृतीयपंथींना थर्ड जेंडर (तिसरे लिंग) मानले जावे, असे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयात म्हटले होते. तृतीयपंथीना समाजात आपले अधिकार मिळावे तसेच त्यांना सन्मानाने वागणूक मिळावी, यासाठी कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. भारतीय संविधानत 'पार्ट-3' मध्ये या संदर्भात उल्लेख आढळतो. संसद आणि विविध राज्यांच्या विधानसभांमध्ये याबाबतच्या विधेयकाला बहुमताना मंजुरी मिळाली होती.
- 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने हा निर्देश रेल्वे मंत्रालयालाही पाठवण्यात आला होता.
- रिझर्व्हेशन-कॅन्सलेशन फॉर्मवर महिला-पुरुषसोबत थर्ड जेंडर/ट्रान्सजेंडरचा समावेश करण्‍यात यावा, असे या आदेशात सांगण्यात आले होते.

पुढील स्लाइडवर वाचा... ट्रान्सजेंडर्ससाठी स्वतंत्र कोच किंवा रिझर्व्ह सीटची करण्यात आली होती मागणी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...