आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

500 Cr महसूलासाठी महाग झाला राजधानी, शताब्दी, दुरांतोचा प्रवास- प्रकरण मोदी-शहांपुढे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- देशातील वेगवान प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या 71 रुटवरील शताब्दी, राजधानी, दुरंतो या रेल्वेच्‍या प्रवास भाड्यात वाढ होणार आहे. त्‍यासाठी 142 रेल्‍वेंमध्‍ये शासनाने फ्लेक्सी फेअर स्किम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शासनाला चौफेर टीकेचा सामना करावा लागत आहे. म्‍हणून मोदी सरकार हा निर्णय परत घेऊ शकते. सुत्रांच्‍या माहितीनुसार, केंद्राच्‍या या पावलाविरोधात विरोधी पक्षच नाही तर, पक्षामध्‍येही नाराजीचा सूर आहे.
रेल्‍वेच्‍या सुत्रांनी ‘भास्कर’ला माहिती दिली की, या भाडेवाढीमुळे रेल्‍वेला 500 कोटी रुपयांचा महसूल प्राप्‍त होऊ शकतो म्‍हणून रेल्‍वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हा निर्णय घेतला. प्रभू यांच्‍या निर्णयाला रेल्‍वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांचा विरोधही होता.
काय आहे प्रकरण.. कसे वाढवले भाडे..
- सूत्रांच्‍या माहितीनुसार, रेल्‍वे राज्यमंत्री सिन्हा म्‍हणाले होते, फ्लेक्सी भाड्यामुळे मध्‍यम वर्गियांना फटका बसेल. त्‍याचा परिणाम भाजपाला भोगावा लागेल कारण पुढील काही महिन्‍यांमध्‍ये पाच राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत.
- मात्र, सुरेश प्रभू यांनी सिन्‍हा यांच्‍या विरोधाची कोणतीही दखल न घेता. हा निर्णय घेतल्‍याचे बोलले जात आहे. त्‍यानंतर सिन्‍हा यांनी ही बाब पीएमओ आणि भाजपाध्‍यक्ष अमित शाह यांच्‍या पुढ्यात मांडली.
- सूत्रांच्‍या माहितीनंतर, शहा यांनी या निर्णयाबाबत सुरेश प्रभू यांच्‍याशी चर्चा केली.
- प्रभू यांनी दावा केला की, या निर्णयामुळे रेल्‍वेला 500 कोटी रुपयांचा नफा मिळू शकतो.
- मात्र, शाह यांनी स्‍पष्‍ट केले की, 500 कोटी रुपयांसाठी भाजपा मध्‍यमवर्गियांना फटका बसेल असा निर्णय घेणार नाही. पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपुर आणि गोवा मध्‍ये विधानसभा निवडणूका आहेत.
बातम्या आणखी आहेत...