आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railways Tightens Ticket Refund Rules News In Amrathi

रेल्वे चुकल्यास एक मार्चपासून रिफंड नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रेल्वेगाडी निघून गेल्यास यापुढे प्रवासभाडे रिफंड मिळणार नाही. तसेच एकत्रितपणे प्रवासास जाणार्‍या प्रवाशांपैकी एकाचे तिकीट रद्द केले तरी पैसे परत मिळणार नाहीत. येत्या 1 मार्चपासून हा नवा नियम लागू केला जाईल. यासाठी रेल्वे तिकिटिंग सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गाडी रद्द झाली, मार्ग बदलल्याने प्रवास करता आला नाही, एसी कोचमध्ये बिघाड, एसी कोच नसेल तरच कन्फर्म रिझर्वेशन व आरएसी तिकिटाचे पैसे परत मिळतील.