आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railways To Launch SMS based Service For Hygiene Complaints

डब्‍यातील साफसफाईसंबंधीच्‍या तक्रारीसाठी रेल्‍वे सुरू करणार एसएमएस सेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- रेल्‍वे डब्‍यांमधील साफसफाई म्‍हणजेच हाऊसकिपिंग संबंधीच्‍या प्रवाशांच्‍या तक्रारीवर तत्‍काळ प्रतिक्रिया देण्‍यासाठी एसएमएसवर आधारित सेवा सुरू करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. ही सेवा प्रथम काही निवडक शहरांतच सुरू होणार आहे. डबा (कोच), शौचालयाच्‍या साफसफाई आणि इतर समस्‍यांबद्दल तक्रार करण्‍यासाठी प्रवाशांना एसएमएस किंवा फोन कॉल करून रेल्‍वेमध्‍ये उपस्थित असलेल्‍या कर्मचा-याशी संपर्क साधता येईल.

रेल्‍वे मंत्रालयाच्‍या एका वरिष्‍ठ अधिका-याने ही माहिती दिली. रेल्‍वेकडून 2013-14च्‍या रेल्‍वे बजेटमध्‍ये घोषित केल्‍याप्रमाणे ऑन साईट पॅसेंजर कम्‍पलेंट रिड्रेसल सिस्टिम (ओपीसीआरएस) विकसित करण्‍यात येत आहे. ही सेवा प्रायोगिक तत्‍वावर मुंबई राजधानी किंवा बेंगळुरू राजधानीमध्‍ये सुरू होऊ शकते.

या प्रणालीनुसार, प्रवासी कोच किंवा शौचालय साफ नसेल, लिक्विड साबण नसण्‍यापासून ते हाऊसकिपिंगसंबंधी इतर समस्‍यांसाठी एसएमएस पाठवू शकतात. ज्‍याप्रमाणे पीएनआरच्‍या माहितीसाठी एका विशिष्‍ठ नंबरचा उपयोग होतो. त्‍याचप्रमाणे ठराविक नंबरवर प्रवासी आपला पीएनआर एसएमएस करू शकतो. यासाठी रेल्‍वेने दूरसंचार विभागाला तीन डिजिटच्‍या नंबरसाठी विचारणा केली आहे. एकदा एसएमएस पाठवल्‍यानंतर जीएसएम नेटवर्कशी जोडलेल्‍या ओपीसीआरएसमध्‍ये ती तक्रार नोंद होईल आणि तत्‍काळ रेल्‍वेतील हाऊसकिपिंग सुपरवायजरकडे असलेल्‍या जीएसएम हँड हेल्‍ड युनिट (मोबाईल फोन)वर पाठवण्‍यात येईल. लगेचच याची माहिती तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईल फोनवर कम्‍पलेंट आयडीसहित तक्रार नोंद झाल्‍याची सूचना मिळेल. काम पूर्ण झाल्‍यानंतर हाऊसकिपिंग सुपरवायजर प्रवाशाकडून कम्‍पलेंट आयडी विचारेल. आणि तो आयडी एसएमएसच्‍या माध्‍यमातून ओपीसीआरएसकडे पाठवेल. ओपीसीआरएसकडून तक्रारकर्त्‍याला तक्रारीचे निवारण करण्‍यात आल्‍याची सूचना दिली जाईल.