आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 वर्षांतील सर्वोत्तम पाऊस; मात्र 58 % भूभागात पाण्यामुळे नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मान्सूनच्या आतापर्यंतच्या वेगावर सरकार खुश आहे. या पावसामुळे महागाई नियंत्रणात येईल, असा विश्वास असून अन्नधान्य उत्पादनातही वाढ होईल. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी म्हटले आहे की, चांगल्या पावसामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. यंदा डाळी, तेलबिया उत्पादनासाठी खास पावले उचलली गेल्याचा दावा सरकारने केला आहे. २९ राज्यांतील सर्व ६३८ जिल्ह्यांमध्ये डाळींचे उत्पादन क्षेत्र वाढवले आहे. पूर्वी १६ राज्यांतील ४८२ जिल्ह्यांचाच यात समावेश होता. मात्र, विशेषज्ञांचे मत वेगळे आहे. त्यांच्या मते सरासरीपेक्षा गेल्या १० वर्षांतील हा सर्वात चांगला मान्सून आहे. मात्र, जिल्हेवार आकडेवारी पाहता वेगळेच संकेत मिळत आहेत. ६४१ जिल्ह्यांपैकी १८२ मध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस झालाय. १४ जिल्ह्यांत अत्यल्प पाऊस आहे. म्हणजे देशातील ३० %भूभाग दुष्काळग्रस्त आहे. २८ % भूप्रदेशात सामान्यपेक्षा अधिक पाऊस आहे. दोन्हींची बेरीज केली तर ५८ % भूप्रदेशात अत्यल्प व अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

चांगल्या मान्सूनमुळे यंदा खरिपात आतापर्यंत १२१.१० लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्यांची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ३५ % अधिक आहे. गेल्या वर्षी ५ ऑगस्टपर्यंत ८९.७२ लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्यांची पेरणी झाली होती. यंदा चांगल्या पेरणीमुळे डाळींचे उत्पादन अधिक होण्याची व त्यांचे दर उतरण्याची शक्यता वाढली आहे.

पुढे वाचा, १२२ दिवसांचा मान्सून ७९ दिवस सरले...
बातम्या आणखी आहेत...