आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर भारतात पाऊस,तर काश्मिरात बर्फवृष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्तर भारतात बुधवारी अनेक ठिकाणी पाऊस पडला. काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्याने राज्याचा अन्य भागाशी संपर्क तुटला. जम्मू-काश्मीरमधील वातावरणामुळे हवाई वाहतूक खंडित झाली. राजधानी दिल्लीत हलक्या सरी कोसळल्या. मात्र शहरातील तापमानात किंचित वाढ झाल्यामुळे नागरिकांना गारठय़ापासून काहीसा दिलासा मिळाला.
दिल्लीमध्ये दिवसभरात सरासरी 1 मि.मी. पाऊस पडला. पर्वत क्षेत्रात जास्तीत जास्त 6.4 मि.मी. पाऊस पडला. शहरात 17.8 अंश सेल्सियस कमाल तापमान नोंदले. मंगळवारी येथील कमाल तापमान 14.6 अंश सेल्सियस तर किमान तापमान 10.2 अंश सेल्सियस नोंदले गेले. जम्मू आणि त्यानजीकच्या पर्वतीय क्षेत्रात मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस पडला. रात्रीपासून बर्फवृष्टी सुरू राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
बुधवारी दिवसभर हवाई व रस्ता वाहतूक खंडित झाली. काश्मीर खोर्‍यात रात्रीपासून वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. जवाहर बोगदा आणि पाटिनटॉप येथे निसरड्या रस्त्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली.