आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंड : पावसामुळे पुन्हा थांबली चारधाम यात्रा, 356 यात्रेकरुंना वाचवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोमवारी झालेला पाऊस उत्तर भारताच्या मैदानी भागांसाठी दिलासादायक ठरला आहे, मात्र डोंगरी भागांसाठी तेवढाच त्रासदायक बनला आहे. दिल्ली आणि चंदिगड सारख्या ठिकाणी सोमवारी झालेल्या रिमझिम पावसामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले. पण हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि इशान्येकडील डोंगरी भागांमध्ये या पावसामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पावसामुळे उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा पुन्हा एकदा थांबवण्यात आली.
केदारनाथ यात्रेच्या मार्गात चिरवासामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे रस्ता बंद झाल्याने अनेक यात्रेकरू अडकले आहेत. मदत पथकाने सुमारे 356 यात्रेकरुंची सुखरुप सुटका करून त्यांना गौरीकुंडपर्यंत पोहोचवले आहे. हिमाचलप्रदेश मध्ये मंडी येथे सर्वाधिक पाऊस झाला आहे. हवामान विभागाने उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

अनेक ठिकाणी भूस्खलन
ऋषिकेशमध्ये रविवारी सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती. उत्तराखंडच्या डोंगराळ भागात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या चर्चाही आहेत. हवामान विभागाने उत्तराखंडच्या अनेक भागांमध्ये पुढच्या 48 तासांत मोठ्याप्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने पौढी गढवाल, नैनिताल, ऊधमसिंग नगरसह अनेक भागांत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

डोंगराळ भागात जोरदार पाऊस
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आगामी पाच दिवसांपर्यंत देशातील डोंगराळ भागामध्ये पाऊस सुरू राहणार आहे. युपी, बिहार, दिल्ली, मध्य प्रदेश, हरियाणाच्या मैदानी भागांमध्येही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पंजाब-हरियाणामध्ये उकाडा
चंदिगडमध्ये रविवारपासून आतापर्यंत 43.5 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पंजाब आणि हरियाणामधील अनेक भागांमध्ये तापमानात वाढ झाली आहे. पंजाबच्या अमृतसरचे तापमान 39.8 आणि हरियाणाच्या हिसारचे तापमान 39 अंश एवढे नोंदवण्यात आले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS...