आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rain Season News In Marathi, Agriculture Ministry, Divya Marathi, Kharip Season

कमी पावसाच्या शक्यतेने कृषी मंत्रालय सक्रिय,केंद्र शासनाने सुरू केल्या उपाययोजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - यंदाच्या खरीप हंगामात कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे, त्यावर उपाययोजना करण्यासाठी कृषिमंत्री शरद पवार यांनी कृषीसह हवामान विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली. संभाव्य अवर्षणाचा धोका पाहता केंद्र शासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

देशाचे कृषी आयुक्त डॉ. जे. एस. संधू यांनी सांगितले की, येत्या खरीप हंगामात नेहमीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी कृषी मंत्रालयाने राज्य शासनांबरोबर उपाययोजना सुरू केल्या आहेत. पंजाब, हरियाणा, उडिसा आणि कर्नाटक या चार राज्यांतील शासनांबरोबर अवर्षणाच्या तयारीवर चर्चाही झाली आहे. तामीळनाडूच्या कृषी अधिका-यांबरोबर लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. येत्या जूनपर्यंत अवर्षणाचा सामना करण्याची तयारी पूर्ण करण्यात येणार आहे. देशातील जलाशयांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आदेश राज्य सरकारांना देण्यात आले आहेत, असेही सिंधू यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात चांगला पाऊस पडणार आहे. मात्र, दुस-या टप्प्यात आॅगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी देशात पाऊस चांगला झाला होता. मात्र, हा पाऊस सर्वत्र नव्हता.काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती होती.

24 वेळा आले ‘अल नीनो’
देशभरात सन 1952 पासून आतापर्यंत 24 वेळा ‘अल नीनो’ हे वादळ आले आहे. त्यामध्ये आठ वेळा कमी प्रभाव, तर नऊ वेळा मध्यम आणि पाच वेळा प्रभावशाली ठरले होते. सन 2002 आणि सन 2009 मध्ये ‘अल नीनो’चा प्रभाव मध्यम होता, त्या वेळी देशातील अनेक राज्यांत दुष्काळ पडला होता. सन 2002 मध्ये 29 टक्के कमी पाऊस झाला होता, तर सन 2009 मध्ये मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस कमी झाला होता. त्यानंतर पाऊस जास्त झाला होता.

26.32 कोटी टन खाद्यान्नाचे उत्पादनाचा कृषी विभागाचा अंदाज
27.71 कोटी टन अन्नधान्याचे उत्पादन 2012-13 मध्ये
> प्रशांत महासागरात घडणा-या घडामोडींमुळे ‘अल नीनो’ या वादळाची शक्यता 60 टक्के आहे.
> या वर्षात देशात सरासरी 96 टक्के पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.