आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raising Day News In Marathi, Delhi, Prison, Divya Marathi

दिल्लीच्या तुरुंगांत रेझिंग डे साजरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीच्या तुरुंगामध्ये शनिवारी रेझिंग डे साजरा करण्यात आला. या वेळी प्रभारी राज्यपाल नजीब जंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या तुरुंग मुख्यालयात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. त्यानंतर पोलिस मुख्यालयाजवळील एका चौकाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणा-यांचा गौरवही त्यांच्या हस्ते करण्यात आला.

तिहार जेलच्या कैद्यांनी रचलेली कविता तुरुंगाच्या 968 मीटर लांब भिंतीवर पेंटिंगच्या रूपात जतन करण्यात आली आहे. त्याचे या वेळी उद्घाटन करण्यात आले. ही पेंटिंग हनिफ कुरेशी आणि त्यांच्या टीमने तयार केली आहे. या कवितेचे शीर्षक ‘चारा दिवारी’ असे आहे. ‘तिनका तिनका पहाड’ नावाच्या कवितासंग्रहातून ही कविता घेण्यात आली आहे. विमला मेहरा आणि वर्तिका नंदा यांनी हे पुस्तक संपादित केले आहे. या पुस्तकात महिला कैद्यांनी इंग्रजी आणि हिंदीमध्ये लिहिलेल्या कवितांचा समावेशही आहे.