आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पाचा ‘राज’ निघाला सट्टेबाज; कुंद्राचीही कबुली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई- चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांचे जावई मयप्पन स्पॉट फिक्सिंगमध्ये पकडले गेले आहेत.... आणि आता राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्रा सट्टेबाजीत गुंतल्याचे उघड झाले आहे. आपण आपल्याच संघावरच सट्टा लावत असल्याची कबुली कुंद्राने दिल्याचा दावा दिल्ली पोलिस आयुक्तांनी केला आहे. त्याचा पासपोर्टही जप्त करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. मात्र, पुरेसे पुरावे नसल्यामुळे त्याला अटक होऊ शकलेली नाही.
कुंद्राचा मित्र उमेश गोयंकाने कुंद्रा गेल्या तीन आयपीएलपासून सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना दिली. कुंद्राने सट्टेबाजीत 1 कोटी रुपये लावल्याचेही त्याने सांगितले.
विशेष पोलिस आयुक्त एसएन श्रीवास्तव म्हणाले, एकदा शिल्पानेही सट्टा खेळल्याची माहिती हाती आली आहे. तिची चौकशी होऊ शकते. राहुल द्रविडलाही विचारणा होऊ शकते. संघात कुंद्राची 11.7 टक्के, सुरेश चेलाराम यांची 44.2, मनोज बडाले यांची 32.4 आणि मर्डोक यांची 11.7 टक्के हिस्सेदारी आहे.

असा काढला राज कुंद्राचा माग
1. श्रीसंतने सिद्धार्थ त्रिवेदीचे
नाव घेतले : चौकशीत श्रीसंत-चंदिलाने सिद्धार्थचे नाव घेतले. सिद्धार्थने चौकशीत पोलिसांना फिक्सिंगमधील सर्व व्यक्तींची नावे उजागर केली.
2. सिद्धार्थचा उमेशकडे इशारा : सिद्धार्थने पोलिसांना सांगितले - उमेश गोयंका मला सामना, संघ रणनीती आणि पीचची माहिती मागत असे.
3. उमेशचा कुंद्राकडे इशारा : गोयंकाची चौकशी- मी कुंद्राच्या सांगण्यावरूनच खेळाडूंकडे माहिती मागत असे.
4. अन् कुंद्रा जाळ्यात : बुधवारी पोलिसांनी कुंद्राची 12 तास चौकशी केली. आपल्याच संघावर सट्टा लावत असल्याची त्याची कबुली.

कुंद्राचा निरर्थक बचाव
कुंद्राने पोलिसांना निरर्थक सवाल केला - मी लंडनमध्ये सट्टा लावत होतो. येथेही लावू लागलो. त्यात काय चुकले? बिचाºयाला जणू कायदेकानू माहीतच नाही.

शिल्पाची दोन रूपे (ट्विट)
० श्रीसंतला पकडले तर क्रिकेटची काळजी : आम्ही चकित आहोत. हे काय घडतंय? आमचा संघ इमानदारीने लढणारा आहे. अवघ्या क्रिकेट जगतासाठी ही चिंताजनक बाब आहे. (16 मे)
० राज अडकल्यावर म्हणे प्रेस बंद करा : माध्यमे बंद करा. हेडलाइनसाठी मीडिया कोणत्याही थराला जात असल्याचे मी बघतेय. कुटुंबासाठी हे चिंताजनक आहे. (6 जून)
‘‘ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर धोनीचीही चौकशी होईल’’ - दालमिया.