आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजनाथसिंह इस्लामाबादमध्ये; दाऊद इब्राहिमचा मुद्दा मांडणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचे गृहमंत्री राजनाथसिंह बुधवारी सार्कच्या गृहमंत्र्यांच्या परिषदेसाठी बुधवारी इस्लामाबादमध्ये दाखल झाले. राजनाथसिंह हे या दौऱ्यात दाऊद इब्राहिम आणि दहशतवाद हे दोन मुद्दे प्रामुख्याने मांडणार आहेत. राजनाथसिंह हे सार्कच्या गृहमंत्र्यांच्या परिषदेत ४ ऑगस्टला सहभागी होतील. त्या वेळी ते दाऊद इब्राहिम आणि सीमेपलीकडून होणाारा दहशतवाद हे मुद्देच प्रामुख्याने मांडणार आहेत. राजनाथ सिंह यांच्यासोबत गृह आणि परराष्ट्र मंत्रालयाचे काही वरिष्ठ अधिकारीही गेले आहेत.

नवी दिल्लीहून रवाना होण्यापूर्वी राजनाथसिंह म्हणाले की, दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी या मुद्द्याबाबत विभागीय सहकार्य आवश्यक आहे. हा मुद्दा आम्ही मांडणार आहोत. सार्कच्या या मंचावर सुरक्षेशी संबंधित मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा केली जाईल. हिजबुलचा कमांडर बुरहान वानी याच्या मृत्यूनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचे संबंध आहेत. त्यामुळे राजनाथसिंह हे पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले.
पुढे वाचा...
जिहादी संघटनांच्या २ हजार कार्यकर्त्यांची निदर्शने