आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीतही आहे वसुंधरा यांचा राजेशाही महाल, प्रत्येक रुममध्ये असते वास्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीतील राजेशाही घरात राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे. - Divya Marathi
दिल्लीतील राजेशाही घरात राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे.
नवी दिल्ली - आपल्याला माहित आहे का? बीजेपीच्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा राजधानी दिल्ली येथेही एक भव्य बंगला आहे विशेष म्हणजे हा बंगला एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. मात्र त्यांच्या या बंगल्याबद्दल कुणालाही फारशी माहिती नाही. वसुंधरा जेव्हा जेव्हा दिल्लीत असतात तेव्हा त्यांचा मुक्काम येथेच ठरलेला असतो. त्या थोड्या कालावधीसाठीही येथे आल्या तरी येथील प्रत्येक रुममध्ये त्यांचे वास्तव असते. त्यामुळे येथील एकही रुम बंद राहात नाही हे विशेष.

एका आर्किटेक्चर मॅगझीनने दावा केला होता की, वसुंधऱा यांचे दिल्लीतील हे घर लक्झरीअस आणि राजेशाही आहे. मॅगझीनच्या वृत्तानूसार काही वर्षांपूर्वी राजेंनी या घराचे रिनोवेशन केले होते. त्यानंतर येथे दगडांवर चित्र काढण्यात आली आणि पोस्टर लावण्यात आले. येथे त्यांचे अनेक पर्सनल फोटो आणि पुस्तके आहेत.

मॅगझीनने म्हटले होते की, राजेंनी या घरात लावलेले फोटो हे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यांच्या निवडीसाठी त्यांनी कित्येक वर्षे दिली आहेत. त्यांनी सांगितले, की पुस्तके मला फार प्रिय आहेत आणि मला असे वाटत राहाते की ती कायम माझ्याजवळ असावीत. जेव्हा मी पुस्तकांसोबत असते तेव्हा मला कधीही एकटेपणा जाणवत नाही. राजेंनी सांगितले, की मी जेव्हा केव्हा येथे येते तेव्हा प्रत्येक रुममध्ये थोडा वेळतरी थांबते. त्यामुळे येथील एकही रुम बंद राहात नाही.
या घराचे डिझाईन तयार करताना येथे नेहमी नैसर्गिक प्रकाश आणि खेळती हवा राहील याची काळजी घेतलेली आहे. त्यासोबतच घराच्या चारही बाजूंनी ताजी फुले असतात. येथे कायम मंत्रजापाची धून ऐकायला मिळते.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, वसुंधरा राजे यांचे दिल्लीतील लक्झरी घर
बातम्या आणखी आहेत...