आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#lalitgate मोदी, शहांनी भेटण्यास दिला नकार, वसुंधरा राजे दिल्लीतून परतल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- निती आयोगाच्या बैठकीसाठी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आज दिल्लीला पोहोचल्या. बैठकीनंतर त्या भाजपचे वरिष्ठ नेतेमंडळी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र कोणत्याही वरिष्ठ नेत्याला न भेटता त्या माघारी परतल्या आहेत. यामुळे चर्चेला उधाण आले असून त्या पक्षावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी भेटण्यास वेळा दिला नाही. त्यामुळे राजे परत राजस्थानला गेल्याचेही सांगितले जात आहे.
ललित मोदी प्रकरणामुळे विरोधी पक्षांकडून वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे. यावेळी भाजपच्या नेत्यांनी सोईस्कर मौन बाळगले होते. मात्र काल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांचा पाठिंबा दर्शविला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज राजे दिल्लीला गेल्या होत्या.
यावर भूमिका मांडताना भाजपच्या राजस्थान युनिटने सांगितले आहे, की ललित मोदी यांनी वसुंधरा राजे यांच्या मुलाच्या हॉटेलमध्ये कायदेशीरपणे गुंतवणूक केली आहे. याची कागदपत्रे संबंधित लोकांना देण्यात आली आहेत.
या प्रकरणी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी राजे यांचा बचाव करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
कॉंग्रेसने वसुंधरा राजे यांच्या टार्गेट केले आहे. कॉंग्रेसने राजे यांचा राजीनामा मागितला आहे. यावर राजे यांनी स्वतः कोणतीही भूमिका मांडलेली नाही. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, वसुंधरा राजे यांनी रद्द केला लंडन दौरा....