आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थान सोडू इच्छित नाहीत अशोक गहलोत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ललित मोदी प्रकरणामध्ये मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे नाव वादात सापडत नाही तोच, राजस्थानमधील काँग्रेस नेत्यांना राज्यात आगामी सरकार आपलेच बनणार, अशी आतापासूनच खात्री झाली आहे. एवढेच नाही, तर पक्षांतर्गत मुख्यमंत्रिपदासाठी अघोषित स्पर्धाही सुरू झाली आहे. पीसीसीचे अध्यक्ष सचिन पायलट आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यात शक्तिप्रदर्शन वाढले आहे.
दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले गहलोत आताही राजस्थानच्या सक्रिय राजकारणात राहू इच्छितात. दुसरीकडे काँग्रेसश्रेष्ठी पायलट यांना कामात स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने गहलोत यांना दिल्लीत बोलावू इच्छित आहे. पायलट गटाने सुटकारा घेण्यासाठी श्रेष्ठीसमक्ष सांगितले की, गहलोत यांना दिल्लीत बोलावून त्यांच्या अनुभवाचा राष्ट्रीयस्तरावर फायदा घेण्यात यावा. पंजाब आणि हरियाणानंतर आता राजस्थान काँग्रेसमध्ये वाढलेल्या वादांमुळे चिंतित झालेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी, पायलट यांना पूर्ण सहकार्य करावे, सोबतच केंद्रातील राजकारणात येण्याचे गहलोत यांना सांगितले आहे.