आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक जुलैपासून रेल्वेत अनेक बदल, राजधानी एक्स्प्रेसमध्ये पेपरलेस तिकीट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आरसी तिकीट असल्यास किंवा एखाद्या कारणामुळे प्रवास रद्द करावा लागल्यास आपण आरक्षित केलेले तिकीट आता टीटीई इतर कोणाला विकू शकणार नाही. आधी टीटीई रिक्त असलेल्या आरक्षित तिकिटासाठी ज्यादा आकारणी करून त्याची विक्री करायचे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावत आहे. या भ्रष्टाचारावर अंकुश मिळवण्यासाठी रेल्वे विभाग लवकरच एक इलेक्ट्रॉनिक उपकरण विकसित करणार असून ते उपकरण प्रत्येक रेल्वेस्टेशनवर लावणार आहे. त्यामुळे टीटीईंना अशा प्रकारचे तिकीट इतरांना देता येणार नाही.
रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, ही योजना नोव्हेंबर महिन्यापासून देशातील जवळपास सर्वच व्यग्र मार्गांवर कार्यान्वित होईल. सुरुवातीला राजधानी, दुरंतो आणि सुपरफास्ट रेल्वेगाड्यांमध्ये ही योजना लागू होईल. विद्यमान व्यवस्थेनुसार, टीटीईकडे प्रवाशांच्या तिकिटांचा संपूर्ण विवरण असलेला एक छापील तक्ता असतो. मात्र, या जागी टीटीईला एक इलेक्ट्रॉनिक उपकरण दिले जाईल आणि ते उपकरण रेल्वेस्टेशनवरील सर्व्हरशी जोडलेले असेल. रेल्वे सुटण्याआधी किंवा त्यानंतर प्रवाशांच्या तिकिटाची जी स्थिती (तिकीट रद्द होणे इत्यादी) असेल ती त्या उपकरणावर दिसू लागेल. टीटीईने रिक्त जागा इतर प्रवाशास विकली तरी त्याची माहिती रेल्वेस्टेशनवरील सर्व्हरमध्ये येऊन जाईल.