आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajdhani And Shatabdi Express Food Will Be Costly

राजधानी, शताब्दीतील जेवण महागणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गेल्या वर्षी सर्व रेल्वेतील अन्न पदार्थांचे भाव वाढवल्यानंतर रेल्वेने आता राजधानी, शताब्दी आणि दुरोंतो रेल्वे गाड्यातील अन्नपदार्थांचे भाव वाढवण्याचाही रेल्वेचा प्रस्ताव आहे. नव्या प्रस्तावानुसार टू टियर आणि थ्री टियर एसी आणि चेअर कार श्रेणीतून प्रवास करणाºयांना प्रथम श्रेणी एसीच्या तुलनेत जेवणासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतील. राजधानी, शताब्दी आणि दुरोंतो रेल्वेतील जेवणाचे पैसे तिकिटामध्येच आकारले जातात.
तिकिटाचे दर न वाढवता किंवा वाढवून या रेल्वेतील जेवणाचे दर वाढवण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात राजधानी, शताब्दी व दुरोंतो वगळता सर्व रेल्वेतील जेवणाचे दर वाढवण्यात आले होते. आता जेवणाचे वाढीव दर तिकिटामध्येच समाविष्ट करण्यात आले तर 22 जानेवारी रोजी करण्यात आलेल्या भाडेवाढीनंतर ही दुसरी भाडेवाढ ठरणार आहे. गेली दहा वर्षे या रेल्वेतील जेवणाचे दर वाढवण्यात आले नव्हते. नव्या प्रस्तावानुसार या रेल्वेतील जेवण 88 रूपयांवरून 125 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.