आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी 5 हजार रुपये महिना कमवायचे राजीव, सोनियांसोबत पहिल्यांदा पाहिला हा चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने गुरुवारी केंद्र सरकारला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बॉम्ब ब्लास्टमध्ये झालेल्या मृत्यूचा तपास करण्याचे निर्देश दिले. तथापि, देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 1991 मध्ये एका सुसाइड बॉम्बरने हत्या केली होती. सुप्रीम कोर्टाने त्याच बॉम्ब ब्लास्टमागे कुणाचे षडयंत्र होते याचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. divyamarathi.com देशाचे यंगेस्ट प्राइम मिनिस्टर राहिलेल्या राजीव गांधींबाबत काही बाबी वाचकांसोबत शेअर करत आहे.
 
एअरलाइन पायलट होते राजीव, सॅलरी होती 5 रुपये महिना
- देशाच्या एकमेव महिला पंतप्रधान राहिलेल्या इंदिरा गांधी यांचे सुपुत्र राजीव गांधी यांना राजकारणात यायचे नव्हते.
- सिमी गिरेवाल यांना दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, मी एक फॅमिली पर्सन आहे. कुटुंबीयांसोबत वेळ घालवणे मला आवडते. याचमुळे मी पॉलिटिक्स जॉइन करायला उत्सुक नव्हतो. मी एक एअरलाइन पायलट होतो आणि 5 हजार रुपये महिना कमवायचो. पण आईच्या म्हणण्यावर मला राजकारणात उतरावे लागले.
 
अशी झाली होती सोनियांशी पहिली भेट
- राजीव गांधींनी सोनियांना पहिल्यांदा केंब्रिजच्या एक ग्रीक रेस्टॉरंटमध्ये पाहिले होते. त्यांना पाहिल्यांदा पाहताच ते मोहित झाले होते. त्यांनी लगेच रेस्टॉरंट मालकाला विनंती केली की त्यांना सोनियांच्या जवळची सीट द्यावी.
- एका मुलाखतीदरम्यान रेस्टॉरंट मालक चार्ल्स एंटोनी म्हणाले होते की, राजीव त्या इटालियन मुलीजवळच्या सीटवर बसू इच्छित होते. त्यांनी मला रिक्वेस्ट केली, पण मी त्यांना म्हणालो की, या सुविधेसाठी तुम्हाला दुप्पट बिल भरावे लागेल. ते तुरंत तयार झाले होते.
- राजीव यांनी त्या वेळी सोनियांसाठी पेपर नॅपकिनवर कविता लिहिली आणि ती रेस्टॉरंटमधील सर्वात महागड्या वाइन बॉटलसोबत त्यांना पाठवली.
- सिमी गिरेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत राजीव म्हणाले होते की, सोनियाला पहिल्यांदा पाहताच मी समजलो की, ही मुलगी माझ्यासाठीच बनलेली आहे. ती खूप स्पष्टवक्ती आणि निर्भीड दिसली. कधीच काही लपवले नाही. खूप मनमिळाऊ दिसली.
 
अशी होती पहिली मूव्ही डेट
- राजीव आणि सोनियांनी पहिल्या मूव्ही डेटवर सत्यजित रे यांचा 'पाथेर पांचाली' सिनेमा पाहिला होता.
- राजीव यांना फोटोग्राफी आणि वेगाने गाडी चालवण्याचा छंद होता. त्यांना नवनवे गॅजेट्सही खूप आवडत. सोनियांना आइस्कीम पसंत होती.
-एकदा राजीव-सोनिया यांना अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ यांनी आपल्या घरी लंचवर बोलावले. तेव्हा अजिताभ यांच्या पत्नीने सोनियांसाठी अनेक फ्लेव्हर्सच्या आइस्क्रीम मागवून ठेवलेल्या होत्या.
 
पुढच्या 9 स्लाइड्समध्ये पाहा, राजीव आणि सोनियांशी निगडित फॅक्ट्स... 
बातम्या आणखी आहेत...