आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajesh Upadhyay Article About Delhi Politics, Divya Marathi

निकालाआधी दाव्यांच्या फुग्यांनी राजधानी व्यापली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील निवडणूक निकाल जाणून घेण्यासाठी महिनाभराची वाट पाहावी लागणार आहे. यामुळेच राजधानीत दावे-प्रतिदाव्यांचे फुगे फुगवले जात आहेत. यामध्ये नेतेही मागे नाहीत. मतदानाआधी अरविंद केजरीवाल म्हणाले होते, आपला दिल्लीच्या सर्व सात जागा मिळत आहेत. त्यावर भाजप नेते हर्षवर्धन यांनी दिल्लीत केवळ मोदींची लाट असल्याचा दावा करत सर्व जागांवर भाजपच जिंकेल, असे सांगितले.

यादरम्यान कॉँग्रेस शांत होती. मात्र, प्रियंका गांधी मोदी लाटेवर मत व्यक्त करत म्हणाल्या की, मला असे वाटत नाही. मतदारांचा उत्साह पाहिल्यास हवेत निश्चित काहीतरी आहे. दिल्लीतील वार्‍याने गेल्या दोन निवडणुकांमध्ये देशाला दिशा दिली होती. हे वारे या वेळी चालेल काय? याचे सांकेतिक उत्तर दिल्लीच्या मतदारांनी दिले आहे. दिल्लीमध्ये जवळपास 65 टक्के मतदान झाले. आम आदमी पार्टीच्या ताब्यातील जागांवरही जोरदार मतदान झाल्यामुळे निवडणूक रंजक ठरली.

दिल्लीमध्ये लोकसभेच्या सात जागा आहेत. प्रत्येक जागेसाठी सर्वाधिक मतदान करणार्‍या पाच-पाच विधानसभांना जोडल्यास ही संख्या 35 होते. मतदानाची आकडेवारी पाहिल्यास यातील 20 जागा आपच्या आहेत, म्हणजे मतदान सामान्यपेक्षा जास्त झाले. चांदनी चौक जागेवर जवळपास 67 टक्के मतदान झाले आहे. मात्र, शकूरबस्ती, सदर बाजार आणि त्रिनगर विधानसभांमध्ये 70 टक्के मतदान झाले. शालीमार बाग आणि वजीरपूरमध्येही सामान्यपेक्षा जास्त मतदान झाले. येथे आपचे तीन तर भाजपचे दोन आमदार आहेत.

सामान्यपेक्षा जास्त मतदानाचा आधार गृहीत धरल्यास नवी दिल्ली जागेमध्ये सर्वाधिक मतदानाच्या पाच जागा आप आमदारांच्या आहेत. पूर्व दिल्लीमध्ये भाजपच्या तीन आणि आपच्या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये चांगले मतदान झाले. दुसरीकडे उत्तर-पश्चिम दिल्लीमध्ये दोन आप, दोन भाजप आणि एक कॉँग्रेसचा आमदार आहे. पश्चिम दिल्लीमध्ये सर्वाधिक मतदान करणार्‍या आपच्या तीन आणि भाजपचे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. अशीच स्थिती दक्षिण दिल्लीतही आहे. म्हणजे, आपच्या तीन आणि भाजपच्या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये जास्त मतदान झाले. उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये सरासरी मतदान 67 टक्के झाले. जवळपास 4 महिन्यांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 65 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी भाजपला 33 टक्के, आम आदमी पार्टीला 29.5 टक्के मते मिळाली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये वाढलेली मते कोणाला मिळणार याबद्दल उत्सुकता आहे.
अचानक मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडण्याची चूक झाली याची कबुली केजरीवाल यांनीच दिली आहे. त्यामुळे मतदार त्यांच्यावर नाराज असू शकतात. दुसरा मोदी फॅक्टर, आपवर नाराज तीन ते पाच टक्के मते भाजपकडे वळल्यास दिल्लीत बहुतांश जागांवर भाजपचाच झेंडा फडकेल.
राजेश उपाध्याय
लेखक दिल्लीचे संपादक आहेत.