आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव हत्याकांड : 100 कोटी खर्च, तरीही तपास चालूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचे मारेकरी तुरुंगात आहेत. कटाचे मुख्य सूत्रधार मारले गेले आहेत. मात्र, या प्रकरणाचा तपास अजून चालूच आहे. कटाची माहिती उघड होण्यासाठी 1998 मध्ये मल्टी डिसिप्लनरी मॉनिटरिंग एजन्सीची स्थापना करण्यात आली होती. वीसहून जास्त परदेशी दौरे आणि तपासावर 100 कोटी रुपये खर्च झाल्यानंतरही या एजन्सीने आतापर्यंत काय काम केले, हे कोणालाही माहीत नाही. 1998 मध्ये एमडीएमएची स्थापना करण्यात आली होती.

40 अधिकार्‍यांच्या या पथकात संयुक्त संचालकांच्या नेतृत्वाखाली उपमहानिरीक्षक आणि दोन पोलिस अधीक्षकांचा समावेश होता. एमडीएमएच्या तपासाची माहिती सीबीआयलाही नाही.