आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajiv Gandhi Assassination: Centre To Move Supreme Court News In Marathi

राजीव गांधींच्या मारेकर्‍यांविरुद्ध केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांच्या सुटकेवर स्थगिती आणल्यानंतर केंद्र सरकारने आणखी चार दोषींच्या सुटकेस आव्हान दिले आहे. सरकारने सोमवारी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 27 फेब्रुवारी रोजी त्यावर सुनावणी होईल.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सिद्धार्थ लुथरा यांनी सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर केंद्राच्या वतीने युक्तिवाद केला. तामिळनाडू सरकारला दोषींची सुटका करण्याचा अधिकार नाही. केंद्राच्या अर्जामध्ये सर्व सात आरोपींची नावे आहेत. यामध्ये संथन, मुरुगन आणि पेरारीवलन यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 18 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निकालानंतर या प्रकरणावरून हालचाली सुरू झाल्या. तामिळनाडू सरकारने 19 फेब्रुवारी रोजी सर्व सात दोषींना मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दुसर्‍याच दिवशी तामिळनाडू सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. यानंतर न्यायायालने संथन, मुरुगन, पेरारीवलन यांच्या सुटकेवर पुढील आदेशापर्यंत स्थगिती आणली.

केंद्राच्या पत्राला उत्तर देणार : जयललिता
या प्रकरणावर आपण लक्ष ठेवून असल्याचे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी सांगितले. केंद्रानेही आम्हाला पत्र लिहिले असून आम्ही त्याला न्यायालयात उत्तर देऊ. सुटकेचा निर्णय राजकीय होता काय, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर भाष्य करू शकत नाही.