आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव गांधींच्या 7 मारेक-यांची जेलमधून लवकरच सुटका होणार- जयललितांचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 7 मारेक-यांची तुरुंगातून आता सुटका होणार आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आज एक विशेष बैठक बोलावून याबाबत निर्णय घेतला. त्यामुळे राजीव गांधी यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी नलिनी, संथान, मुरूगन आणि पेरारीवलन यांचीही लवकरच सुटका होईल.
सुप्रीम कोर्टाने राजीव गांधी यांच्या तीन मारेकर्‍यांच्या फाशीची शिक्षा माफ करत जन्मठेपेत बदलली आहे. फाशी माफीसाठी सांथन, मुरुगन व पेरारीवलन या तिन्ही मारेकर्‍यांनी सन 2000 मध्ये राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. त्यावर 11 वर्षांनी निर्णय झाला. हा विलंब अनावश्यक असल्याचे न्यायालयाने मान्य केले होते. सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने 4 फेब्रुवारीला राखून ठेवलेला निकाल मंगळवारी दिला. या निकालावर द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी आनंद व्यक्त केला होता. एमडीएमके नेते वायको यांनी तिन्ही आरोपींना लवकर मुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री जयललिता यांनी विशेष बैठक घेऊन राजीव गांधींच्या मारेक-यांची जेलमधून सुटका करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
सांथन, मुरूगन, पेरारीवलन गेली 23 वर्षे तुरूंगात आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाने त्यांची शिक्षा फाशीतून जन्मठेपेत केली आहे. जन्मठेप झालेल्या गुन्हेगारांना 14 वर्षे तुरुंगात काढावी लागतात. मात्र वरील आरोपींनी त्यापेक्षाही अधिक काळ तुरुंगात घालविल्याने त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
जयललितांच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाच्या वकीलांना काय वाटते, वाचा पुढे....
राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे... त्यांच्या दया अर्जावर निर्णय घेण्यास विलंब झाल्याने फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली आहे... या एकंदर घडामोडींवर आपल्याला काय वाटते... आपल्या प्रतिक्रिया द्या... आमच्या फेसबुक पेजला भेट द्या...