आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajiv Gandhi Wanted Bofors Money To Run Congress: Ex CBI Chief

राजीव गांधींना बोफोर्सचा पैसा कॉंग्रेसला पुरवायचा होता, पुस्तकात दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बोफोर्स घोटाळ्यातील डिफेन्स सप्लायर्स यांनी दिलेले कमिशन कॉंग्रेस पक्षाचा खर्च भागविण्यासाठी वापले जावे असे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे मत होते, असा दावा केंद्रीय अन्वेषण विभाागाचे (सीबीआय) माजी संचालक ए. पी. मुखर्जी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
1989-90 या कालावधीत ए. पी. मुखर्जी सीबीआयचे संचालक होते. मुखर्जी यांनी लिहिलेल्या आत्मचरीत्रात म्हटले आहे, की यावरून नोकरदार, केंद्रीय मंत्री, मध्यस्थ, शस्त्र पुरवठा करणाऱ्या कंपन्या यातील छुपे संबंध उघडकीस येतात. माझी राजीव गांधी यांच्यासोबत 19 जुन 1989 रोजी त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली होती. यावेळी त्यांनी माझ्याजवळ त्यांचे मत व्यक्त केले होते.
मुखर्जी म्हणाले, की संरक्षण दलांसाठी नवीन शस्त्रे विकत घेताना संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय मंत्री आणि मध्यस्थांना कोट्यवधी रुपये कमिशनच्या रुपात मिळत असल्याचे राजीव गांधी यांना 1984 दरम्यान समजले होते. यासंदर्भात त्यांनी काही सल्लागारांसोबत चर्चाही केली होती. त्यावर बंदी घालण्याची मागणी तेव्हा काहींनी केली होती. परंतु, अशा व्यवहारांमध्ये कमिशन मिळणे अगदी सामान्य असल्याने ते गैरसरकारी संस्थेला देऊन दैनंदिन खर्च भागविण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात यावा, असा विचार पुढे आला होता.
पार्टी फंडला लिगल करण्याचा होता राजीव गांधी याचा विचार, वाचा पुढील स्लाईडवर