आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणापासून काहीसे दूर कुटुंबासमवेत असा वेळ घालवत राजीव, पाहा छायाचित्रे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा ऐतिहासिक असा दारूण पराभव झाला. या पराभवाचे कारण होते भ्रष्टाचार. याच भ्रष्टाचारामुळे सोनिया आणि राहुल गांधी सत्तेपासून दूर गेले आहेत. एके काळी कधी राजीव गांधी भ्रष्टाचाराला समाजाचा सर्वात मोठा शत्रू मानत. आपल्या आधुनिक विचाराने व निर्णयामुळे एक वेगळी ओळख बनवलेल्या राजीव गांधींची 21 मे 1991 रोजी हत्या करण्यात आली होती.
राजीव यांना राजकीय सत्ता वारसाने मिळाली होती. त्यांची आई इंदिरा गांधी देशातील पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. राजकारणापासून दूर राहत असलेले व त्यात रस नसलेले राजीव गांधी एक वैमानिक म्हणून आपले करिअर करू इच्छित होते. त्यासाठी ते लंडनला उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले. 1965 मध्ये तेथेच सोनिया मायनो यांची भेट झाली. सोनिया त्यावेळी लंडनमध्ये एका रेस्टांरंटमध्ये अर्धवेळ वेट्रेस म्हणून काम करीत होत्या. एक दिवस याच रेस्टांरंटमध्ये या वेट्रेसला पाहून राजीव तिच्या प्रेमात पडले.
सोनिया मायनो (पूर्ण नाव एंटानियो एडविग एलबिना मायनो Antonia Edvige Albina Maino) यांनाच आज आपण देशातील सर्वात शक्तीमान महिलांपैकी एक सोनिया गांधी या नावाने जानतो. खरं तर राजीव आई इंदिरा व छोटा भाऊ संजय यांच्याप्रमाणे राजकारणात जावू इच्छित नव्हते. सोनियासुद्धा राजकारणाच्या विरोधात होत्या. मात्र, नशिबाला वेगळेच काहीतरी मंजूर होते. संजय यांच्या (1981) मृत्यूनंतर इंदिरांनी राजीवला राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर तीनच वर्षांनी 1984 ला आई इंदिराजींचीच हत्या करण्यात आली. आईच्या हत्येनंतर राजीव यांना काही तासातच पंतप्रधानपदाची शपथ घ्यावी लागली.
राजकारणात येण्याआधी राजीव वैमानिक होते. आपल्या कामानिमित्त ते नेहमीच कुटुंबापासून दूर राहत असायचे. मात्र ते जेव्हा कुटुंबासमवेत वेळ घालवायचे ते क्वालिटी टाईम घालवत असे.
पुढील स्लाईडद्वारे पाहा राजीव यांचे आपल्या कुटुंबियांसमवेतील छायाचित्रे...