नवी दिल्ली- माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणात दोषी असलेल्या तीन मारेक-यांची आज फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरीत करण्यात आली. संथान, मुरूगन आणि पेरारीवलन या तीन मारेक-यांनी फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप द्यावी, अशी विनंती करीत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी झाली. या तीन मारेक-यांची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेत रूपांतरीत करण्यात आली आहे.
या मारेक-यांनी याचिका दाखल करताना म्हटले होते, की आम्ही राजीव गांधी हत्याप्रकरणात दोषी आहोत. याबद्दल आम्हाला फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. याबाबत आम्हाला दया दाखवावी, अशी याचिका राष्ट्रपतींकडे 11 वर्षापूर्वी केली होती. मात्र 11 वर्षानंतरही या अर्जावर निर्णय होत नसल्याने आम्ही आमची फाशीची शिक्षा रद्द करावी, अशी विनंती करीत आहोत.
ही याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ती आपल्याकडे वर्ग करून घेतली होती. दयेच्या अर्जांवर सरकारकडून विलंब झाल्याच्या मुद्यावर न्यायालयाने आतापर्यंत 15 दोषींची फाशीची शिक्षा रद्द केली आहे. हाच मुद्दा धरून राजीव गांधींच्या मारेक-यांनी फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी केली होती.
दोषी दयेच्या पात्रतेचे नाहीत- केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात केला होता युक्तीवाद, वाचा पुढे....