आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajmohan Gandhi Targets Narendra Modi Ask To Declare Source Of Election Campaign Expenses

‘आप’ला हवा नरेंद्र मोदींच्या प्रचारातील खर्चाचा हिशेब!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचाराच्या खर्चाची गोळाबेरीज करण्यात गुंतलेल्या कॉँग्रेसच्या पाठोपाठ आम आदमी पार्टीनेही या विषयाकडे लक्ष वेधले आहे. पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पार्टीचे उमेदवार आणि महात्मा गांधीजींचे नातू राजमोहन गांधी यांनी मोदी यांच्या सभांवर होणार्‍या कोट्यवधीच्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह उभे केले आहे. नरेंद्र मोदींनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राजमोहन गांधी यांनी मोदींच्या वृत्तपत्रातून येणार्‍या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती आणि भव्य सभांचे आयोजन यासाठी पक्षाकडे पैसा कोठून येतो याबाबत संशय व्यक्त केला. हाच पैसा जर गरिबांसाठी खर्च झाला असता, तर एक चांगले कार्य घडले असते. मोदींचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे अमित शहा यांच्यावरील बंदी निवडणूक आयोगाने हटवून त्यांना प्रचार करण्याची परवानगी दिली असली तरी कोणी व्यक्ती भांडणे लावत असल्यास त्याचे सगळ्यांना दु:ख व्हायला पाहिजे; याकडेही त्यांनी लक्ष वेधले. नरेंद्र मोदी गुजरात मॉडेलचा पुरस्कार करत आहेत. गुजरातमध्ये काही भागांमध्ये निश्चित विकास झालेला आहे, परंतु काही भाग असे आहेत तिथे लोक विकासाच्या प्रतीक्षेत आहे. नरेंद्र मोदी हे सांप्रदायिक आहेत अथवा नाही याबाबत उमा भारतीच चांगले सांगू शकतील. मोदी हे देशासाठी विनाशकारी असल्याची टीका उमा भारती यांनीच केली होती, अशी प्रतिक्रिया गांधी यांनी दिली.

अरविंद केजरीवाल यांच्या सभांवर हल्लाबोल करणार्‍या भाजपचा राजमोहन गांधी यांनी निषेध केला. ते म्हणाले, या देशात निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार मिळाला आहे.

केजरीवाल यांनी त्यांच्या दिल्लीच्या कार्यकाळात उत्तम काम केलेले आहे. मात्र, त्यांनी नरेंद्र मोदी यांना वाराणसीतून आव्हान दिल्यामुळे त्यांच्या सभा उधळून लावणे ही सभ्यता नाही. स्वत: नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या या कृत्याचा निषेध करायला पाहिजे.