आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी विधेयकात मंजुरीनंतर दुरुस्ती,: राजनाथ सिंह यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेमध्ये जीएसटी विधेयक मंजूर करण्याचे आवाहन विरोधकांना केले आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर भविष्यात त्यात दुरुस्ती होऊ शकते, असे ते म्हणाले.

विधेयक मंजूर होण्यासाठी मी सर्व पक्षांना पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहे. व्यापाऱ्यांच्या सूचनेनुसार भविष्यात त्यात दुरुस्ती करण्यास आमची तयारी आहे, असे राजनाथ यांनी व्यापाऱ्यांच्या परिषदेत सांगितले. विधेयक मंजूर होण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, विरोधकांकडून वारंवार अडथळा आणला जात असल्यामुळे त्यात यश येत नाही. जीएसटी विधेयक लोकसभेत मंजूर झाले. मात्र, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या विरोधामुळे राज्यसभेत ते मंजूर होऊ शकले नाही. जागतिकीकरणात व्यापाऱ्यांचे हित दुर्लक्षित होणार नाही, असे आश्वासन सिंह यांनी यावेळी दिले. व्यापारी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जागतिकीकरणाचा व्यापाऱ्यांवर परिणाम होणार नाही, असे आश्वासन देतो. किरकोळ विक्रेत्यांच्या समस्या आम्हाला माहीत आहेत. त्यांचे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही.
आमचे आधी आणि आताही व्यापाराभिमुख धोरण आहे. भारत आणि चीन जागतिक अर्थव्यवस्थेला इन्पुट देत असून रालोआ सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. महागाई, आर्थिक तूट आणि चालू खात्यातील तुटीच्या टक्केवारीचा आकडा दोन आकडी होता. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यात घसरण झाली, असा दावा राजनाथ सिंह यांनी केला.