आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राम मंदिर महत्त्वाचेच, लक्ष्य मात्र विकासाचे, गृहमंत्र्यांनी मांडली भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अयोध्येत राम मंदिराची उभारणी महत्त्वाचीच आहे. मात्र, सध्या सरकारने विकासावरच लक्ष केंद्रित केले असल्याचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार कसोशीने प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. नरेंद्र मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राम मंदिर मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट असला तरी दोन्ही बाजूंनी विचार करून काही तोडगा काढला तर हा प्रश्न सुटू शकेल, असे राजनाथ म्हणाले. हा मुद्दा केंद्राने थंड बस्त्यात टाकल्याचे बोलले जात आहे. यावर भाष्य करताना राजनाथ यांनी उपरोक्त खुलासा केला.

मी अजूनही संघ स्वयंसेवक
केंद्र सरकारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हस्तक्षेप होत असल्याच्या मुद्द्यावर थेट भाष्य करण्याचे टाळून राजनाथ म्हणाले, मी संघाचा स्वयंसेवक असल्याने संघाच्या विचारसरणीवर माझा विश्वास आहे. संघ भारतीय संस्कृती जपतो. म्हणूनच भारतात इस्लामचे सर्व पंथ आहेत, केरळमध्ये २ हजार वर्षांपूर्वीचे चर्च आजही डौलाने उभे आहे.

दाऊद हवाच पण...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आहे कुठे? याबाबत राजनाथ यांनी सांगितले, दाऊदविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. दाऊदला भारताच्या ताब्यात द्यावे म्हणून वारंवार पाक सरकारला विचारणा केली आहे. यासंबंधीची कागदपत्रेही २०१२ मध्ये भारताने पाककडे सोपवली होती.

गोमांसाच्या मुद्द्याने दांडी!
विकासाच्या मुद्द्यावर ठामपणे बोलणारे राजनाथ गोमांसाच्या मुद्द्यावर मात्र गप्प राहिले. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी गोमांस भक्षण करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, असे वक्तव्य केले होते. याबाबत विचारले असताना राजनाथ यांनी मौन बाळगणे पसंत केले. बिनबाद धावा ठोकणारे हे सरकार असल्याचा दावा करणाऱ्या राजनाथ यांची दांडी गोमांसाचा मुद्दा उपस्थित करून पत्रकारांनी उडवली.

आयएसचे आव्हान
इसिससारख्या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असल्याच्या माहितीबद्दल राजनाथ म्हणाले, हे केवळ १०-१५ तरुण आहेत. राष्ट्रीय तपास संस्था या युवकांचा कसून शोध घेत आहे. पणे हे आव्हान आहे.

राजनाथ म्हणाले...
{ अडवाणी आमचे नेते. त्यांच्याबद्दल कायम आदरच राहील.
{ मोदी सरकारने वर्षभरात भारताला प्रतिष्ठा मिळवून दिली.
{ दहा वर्षांपासून देशातून हद्दपार झालेले सुशासन परतले आहे.
{ मोदी सरकारच्या काळात देशातील अंतर्गत सुरक्षा वाढली आहे.
{ पर्यटनाला चालना देण्यासाठी ई-टुरिस्ट व्हिसा सुविधा दिली.
{ काश्मीरमधील फुटीरवाद्यांशी चर्चेचा विचार नाही.
बातम्या आणखी आहेत...