नवी दिल्ली - गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिल्लीत साठेबाजांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. यानंतर अधिकार्यांनी बटाटे आणि कांद्याची साठेबाजी करणार्या सुमारे साडेपाचशे जणांवर धाडी टाकल्या.
आज राज्यातील पुरवठामंत्र्यांची बैठक : महागाई नियंत्रण व साठेबाजांविरुद्ध कारवाईसाठी राजधानीत शुक्रवारी राज्यांच्या पुरवठामंत्र्यांची बैठक होत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली, कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. महागाई, कृषि उत्पन्न बाजार समिती कायदा आणि साठेबाजी या विषयांवर प्रामुख्याने बैठकीत चर्चा होईल. दुसरीकडे बटाटा महागण्याच्या शक्यतेनंतरही भारतातून रोज दोन हजार टन बटाट पाकिस्तानात निर्यात होत आहे.
(फोटो - गृहमंत्री राजनाथसिंह)