आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PAKकडून सर्जिकल स्ट्राइकवर पुरावे मागितल्यानंतर राजनाथ म्हणाले- 'वाट पाहा आणि बघा'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली: राजनाथ सिंह यांनी सर्जिकल स्ट्राईकला पाकिस्तानकडून अस्विकार आणि पुराव्यांच्या प्रश्नावर "वाट पाहा आणि बघा" असा सल्ला दिला आहे. गृहमंत्र्यांनी रविवारी सांगितले की, आमच्या जवानांच्या पराक्रमाला संपूर्ण जगाने पाहिले आहे आणि ज्याप्रकारे त्यांनी हे मिशन पुर्ण केले त्यावर आम्हाला गर्व आहे. आणखी काय म्हणाले राजनाथ....

- स्मार्ट टॉयलेटच्या उद्घाटनाच्या प्रसंगी माध्यमांनी राजनाथ यांना सर्जिकल स्ट्राईकबद्दल प्रश्न विचारले. पाकिस्तान सर्जिकल स्ट्राईकला नाकारत आहे आणि पुरावेसुध्दा मागत आहे असा प्रश्न विचारल्यावर राजनाथ म्हणाले "वाट पाहा आणि बघा".
- पाकिस्तानी टीव्ही चॅनल्सवर काही बनावट व्हिडीओ दाखवले जात आहेत. यामाध्यमातून भारतीय सैन्याचे बंकर पाकिस्तानने उडवले आहे असा खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर सर्जिकल स्ट्राइकच्या घटनेला पाकिस्तान नाकारत आहे.
- इंडियन आर्मीने या व्हिडीओजना बनावट सांगत हा पाकिस्तानचा प्रपोगंडा असल्याचे सांगितले आहे.
वेंकैय्या म्हणाले - स्वच्छ झाली एलओसी
- केंद्रीय मंत्री वेंकैया नायडू म्हणाले की, पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक केल्यामुळे भारताने एलओसी स्वच्छ केली आहे.
- एका प्रश्नावर जेव्हा नायडू म्हणाले, काही दिवसांपूर्वी तुम्ही मोदींना पाहिले. आपला शेजारी दहशतवाद्यांना फंड आणि ट्रेनिंग देत आहे. आमच्या सैन्याने त्यांना योग्य ते उत्तर दिले आहे.
- स्वच्छ मन, स्वच्छ धन, स्वच्छ तन आणि आता सीमा सुध्दा स्वच्छ करण्यात आली आहे. आता आम्ही स्वच्छ भारतच्या दिशेने पुढे जात आहोत, असे ही ते म्हणाले.
बंदी जवानाला वापस आणण्यास काही दिवस लागतील.
- संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले की, पाकिस्तानमध्ये कैदेत असलेला भारतीय जवान चंदू बाबूलाल चव्हाणला मायदेशी परत आणण्यास अजून काही दिवस लागतील.
- ते म्हणाले की, दोन्ही देशातील डीजीएमओ यावर चर्चा करत आहेत. काही दिवसांपूर्वी एक भारतीय जवान रस्त्या भटकल्याने पाकिस्तानच्या सीमेत दाखल झाला होता. तेव्हा त्याला पाकिस्तानने कस्टडीत घेतले.
बातम्या आणखी आहेत...