आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rajnath Singh News In Marathi, Nitin Gadkari, Parliament

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नितीन गडकरीच्या बंगल्यात हेरगिरीचे उपकरण सापडल्याचे वृत्त तथ्यहीन- गृहमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हेरगिरी करणारी उपकरणे सापडल्यावरून खळबळ मजली आहे. दुसरीकडे गृहमंत्री राजनाथसिंह आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या ज्येष्ठ मंत्र्यांच्या घरीही अशीच हेरगिरी झाली असल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे. यावरून आज (बुधवार) राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. परंतु हेरगिरीचे उपकरण सापडल्याचे वृत्त तथ्यहीन असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
राजनाथ सिंह म्हणाले, यापूर्वी लोकसभेत गडकरी यांनी हेरगिरीचे उपकरण सापडल्याचे वृत्त फेटाळले आहे. याबाबत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार आहे. प्रसिद्ध झालेल्या वृत्तात गडकरी यांच्या बेडरूममध्ये उच्च क्षमतेचे रेकॉर्डिंगचे उपकरण आढळ्याचे म्हटले आहे. या निराधार वृत्ताला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व देऊ नये.
गडकरी यांनी संसद भवन परिसरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी गडकरी यांनी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताला पुन्हा एकदा फेटाळून लावले. सरकारनेही हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले आहे.
लोकसभा आणि राज्यसभेत कॉंग्रेससह अन्य पक्षांनी हेरगिरी उपकरणप्रकरणाचा मुद्दा लावून धरला होता. गडकरी यांच्या निवासस्थानी कोणतेही हेरगिरीचे उपकरण सापडले नसल्याचेही राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे.

दुसरीकडे, कॉंग्रेसकडे सदनात मांडण्यासाठी याशिवाय दुसरा मुद्दा असे सांगून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी देखील गडकरींची पाठराखण केली आहे. तसेच या मुद्यावरून गदारोळ करणे हे दुर्भाग्याची गोष्ट असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, गडकरींनंतर आता सुषमा स्वराज, राजनाथांचीही हेरगिरी!