आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rajnath Singh Tells Shatrughna Sinha To Restrain From Commeting Against Narendra Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींबाबत सबुरीने घ्‍या- 'शॉटगन'च्‍या शेरेबाजीला ला राजनाथ सिंह यांचा चाप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारतीय जनता पक्षात पंतप्रधानपदाच्‍या उमेदवाराच्‍या नावावरुन वाद थांबता थांबत नाहीत. शत्रुघ्‍न सिन्‍हा यांच्‍यानंतर आता ज्‍येष्‍ठ नेते जसवंत सिंग यांनीही पंतप्रधानपदाच्‍या उमेदवारीबाबत उघडपणे मत मांडले आहे. निवडणुकीनंतरच पंतप्रधानाचे नाव ठरले पाहिजे, अशी भूमिका त्‍यांनी मांडली आहे. तर दुसरीकडे पक्षविरोधी वक्तव्य करणा-या 'शॉटगन' अर्थात खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची पक्षाचे अध्‍यक्ष राजनाथ सिंह यांनी कानउघाडणी करुन शांत राहण्‍याचा सल्‍ला दिला आहे.

भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्‍हणून नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. परंतु, जसवंत सिंग यांनी सांगितले की, आपल्‍याकडे अध्‍यक्षीय राज्‍य पद्धती नाही. त्‍यामुळे पंतप्रधानाचे नाव निवडणुकीनंतरच ठरले पाहिजे. एका मुलाखतीत त्‍यांनी सांगितले, की निवडणुकीनंतर तुम्‍हाला किती जागा मिळतील, हे ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे आधीच नाव घोषित करु नये. निवडणुकीपूर्वी पीएमपदाच्‍या उमेदवाराचे नाव घोषित करणे घाईचे होईल, असे छत्तीसगढचे मुख्‍यमंत्री रमन सिंह यांनीही म्‍हटले होते.

दुसरीकडे शॉटगनला समज देताना राजनाथ सिंह यांनी त्‍यांना नितीशकुमार यांच्‍या बाजूने आणि मोदींच्‍या विरोधात मत मांडताना संयम बाळगावा आणि अशा प्रकारची कोणतीही वक्तव्‍ये करु नये. गेल्या पंधरवडाभरात त्यांनी तीन वेळा अशी जाहीर विधाने केली आहेत. मोदी हे लोकप्रिय असतील, मात्र लोकप्रियतेचा निकष लावायचा ठरविल्यास अमिताभ बच्चन यांनाच पंतप्रधान करा, असे सिन्‍हा यांनी दोन दिवसांपूर्वी म्‍हटले होते. तसेच पंतप्रधानपदासाठी मोदींपेक्षा लालकृष्ण अडवाणी हेच अधिक योग्य उमेदवार आहेत, असे सांगताना त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचेही कौतुक केले होते. त्‍यामुळे शॉटगन यांच्‍यावर भाजप नेत्‍यांनी नाराजी व्‍यक्त केली होती. बिहारमध्‍ये भाजप नेत्‍यांनी पक्षनेतृत्त्वाकडे याबाबत तक्रारही केली होती.