फाइल फोटो: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपान दौ-यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री नरेंद्र मोदी सरकारचे कामकाज सांभाळणार आहेत. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालाकडून प्रेस नोट जारी केले जाण्याची शक्यता आहे. त्याआधी ब्राझील दौ-यादरम्यानही पंतप्रधान कार्यालयातर्फे प्रसिद्धीपत्रक काढून राजनाथ सिंह यांना जबाबदारी सोपवण्यात आली होती. मोदी शनिवारी पाच दिवसांच्या परदेश दौ-यासाठी रवाना होत आहेत.
मोदींच्या अनुपस्थित होणा-या मंत्रिमंडळ बैठकीचे नेतृत्व राजनाथ सिंह हेच करतील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींच्या अनुपस्थितीत सरकारची जबाबदारी सांभाळावी लागणार असल्याने राजनाथ सिंह यांनी जम्मू काश्मीर दौराही रद्द केला आहे. त्याचे कारण म्हणजे मोदींच्या अनुपस्थितीत राजनाथ सिंह यांचे दिल्लीत राहणे गरजेचे असेल.
पुढे वाचा, खास मोदींसाठी जपानमध्ये आयोजित केली जाणार चहापार्टी...
जपान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करत आहे. सोमवारी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे मोदींसाठी पारंपरिक चहापार्टीचे आयोजन करणार आहेत. या चहापार्टीला तपानमध्ये चानोयु असे म्हणतात. जपानमध्ये काही खास प्रसंगांना अशा चहापार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. अशा पार्ट्यांमध्ये खास पाहुण्यांना आमंत्रित केले जाते. या पार्टीत मोदींना माचा नावाचा चहाचा प्रकार दिला जाण्याची शक्यता आहे. हा जपानचे पंतप्रधान शिंजो यांचा आवडता चहाचा प्रकार आहे. या दौ-यात मोदी इतर मुद्यांबरोबरच नागरी अणुकरार आणि जमीन व पाण्यातून उड्डाणाची क्षमता असणा-या विमानांच्या खरेदीचा करार करण्याची शक्यता आहे.