आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajnath Singh\'s \"Time For Change, Time For BJP\" Tweet Raises Eyebrows News In Marathi

भाजप आणि नरेंद्र मोदींच्या आत अडकले राजनाथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जी गोष्ट मनात असते, ती ओठावर येतेच. भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्याबाबतीतही रविवारी रात्री तसेच घडले. देशभरात भाजपचे बॅनर्स आणि पोस्टर्स लागलेले आहेत. त्यावर केवळ मोदींची छायाचित्रे आणि वेगवेगळ्या मुद्दय़ांवर ‘अबकी बार, मोदी सरकार’ असे मोदींचेच नारे लिहिण्यात आलेले आहेत. मात्र रविवारी रात्री 12.47 वाजता राजनाथसिंह यांच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्टर ट्विट करण्यात आले. त्यात ‘अबकी बार भाजप’ असे लिहिण्यात आले होते. छायाचित्रही मोदींऐवजी राजनाथांचेच होते.

ज्या पद्धतीने त्यावर विश्लेषणे येऊ लागली तेव्हा पोस्टर आणि त्यातील घोषणा पचनी पडलेली नाही, हे भाजप अध्यक्षांच्या लक्षात आले. त्यामुळे 3- मिनिटांनी म्हणजेच रात्री 1 वाजून 17 मिनिटांनी ट्विटरवरून पहिले पोस्टर काढून टाकण्यात आले आणि ‘अबकी बार, मोदी सरकार’असे पोस्टर पोस्ट करण्यात आले. कमी जागा मिळाल्या आणि मोदींच्या नावावर पाठिंबा देणारे पक्ष राजी झाले नाहीत तर पंतप्रधानपदासाठी राजनाथ पुढे येतील, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. राजनाथ यांनी याबाबतीत काही पक्षनेत्यांशी बोलून तसा प्रस्ताव ठेवल्याचीही चर्चा आहे.

देशभरात मोदींच्या 26 तारखेपासून 185 सभा
मतदानाआधी मोदी 26 मार्चपासून देशभरात 185 विजयी सभा घेणार आहेत. पक्षाचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले की, या सभा 295 मतदारसंघ कव्हर करतील. मोदी बर्‍याच दिवसांपासून देशभरात प्रचारसभा घेत आहेत. पण शेवटच्या टप्प्यात ‘मोदी फॉर पीएम’ची मोहीम तीव्र केली जाणार आहे. पक्षाध्यक्ष राजनाथसिंह 155 ते 160 सभा घेणार आहेत. लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, मुरली मनोहर जोशी आणि अन्य ज्येष्ठ नेतेही विविध मतदारसंघांत सभा घेणार आहेत.

मोदींविरुद्ध लढण्याची दिग्विजयसिंह यांची इच्छा
पक्षाने तिकीट दिल्यास आपली नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसीतून लढण्याची इच्छा असल्याचे कॉँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे. मोदी यांना आव्हान देण्याची इच्छा आहे, मात्र पक्षाने आधी तिकीट दिले पाहिजे, असे सिंह म्हणाले.

मोदींना वाराणसीतून पळ काढावा लागेल
नरेंद्र मोदींची देशात आणि उत्तर प्रदेशात लाट नाही. मोदींची लाट केवळ प्रसारमाध्यमांमध्ये आहे. लोक वाराणसीमध्ये त्यांची वाईट स्थिती करतील. यामुळे त्यांना या शहरातून पळ काढावा लागेल, अशी टीका सपा अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी केली आहे.

सपाचा नारा - थर-थर मोदी, डर-डर मोदी
वाराणसीमध्ये सपा कार्यकर्त्यांनी हर-हर मोदी घोषणेविरोधात मोदी यांच्या पोस्टरवर काळी शाई फासली. भाजपने या घोषणेपासून अंतर राखले आहे. मात्र, सपा कार्यकर्त्यांनी सोमवारी मोदी यांची तुलना भगवान शिवासोबत केल्याचा आरोप भाजपवर लावला आहे. याबरोबर थर-थर मोदी, डर-डर मोदी या घोषणेसह एक पोस्टरही प्रसिद्ध केले आहे.