आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजनाथ जाणार अमेरिका, रशियाच्या दौऱ्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजनाथ सिंह लवकरच अमेरिका व रशियाचा दौरा करणार आहेत. दौऱ्याच्या माध्यमातून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडून शेजारी देशांवर दबाव वाढवणार आहेत. त्याचबरोबर प्रादेशिक पातळीवरील इसिसच्या हालचालींना रोखण्यासाठीदेखील ते प्रयत्न करतील.

दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सिंह रशियाला भेट देतील. त्यांचा दौरा १८ सप्टेंबरपासून सुरू होईल. त्यांची रशिया भेट पाच दिवसांची असेल. रशियाचे गृहमंत्री व्लादिमीर कोलोकोलत्सेव्ह यांच्याशी त्यांची द्विपक्षीय चर्चा होईल. भारत-रशिया यांच्यातील दहशतवाद प्रतिबंधक सहकार्य प्रकल्पावरही उभय नेत्यांमध्ये विचारविनीमय होऊ शकतो. जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी कारवायांच्या समस्येवरही उभय देशांत चर्चा होणार आहे. २६ सप्टेंबर रोजी गृहमंत्री वॉशिंग्टनला रवाना होतील. त्यांचा हा सात दिवसांचा दौरा आहे. त्यांचे समकक्ष जेह चार्ल्स जॉन्सन यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी जी-२०, ब्रिक्स, पूर्व-आशिया परिषदेच्या बैठकीत या मुद्द्यावर पाकिस्तानचा दुटप्पीपणा उजेडात आणला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचा नेता दाैऱ्यावर जात आहे.
प्रत्यार्पणासह अनेक मुद्दे अजेंड्यावर
गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा दौरा सुरक्षा, संरक्षण, दहशतवादाचे उच्चाटन यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रशिया व अमेरिकेसोबत या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर भर देतील. त्याचबरोबर गुन्हेगारी नियंत्रणासाठी गुन्हेगार हस्तांतरणासंबंधीही परस्परांत करार होऊ शकतो. व्हिसामध्ये सवलतीसाठीदेखील रशिया, अमेरिकेसोबत नवे करार अपेक्षित आहेत.
बातम्या आणखी आहेत...