आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजनाथ यांचे ट्विटरवर ५ लाख फॉलोअर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरील फॉलोअर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली अाहे. ट्विटरवरील फॉलोअर्सच्या बाबतीत सिंह देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री ठरले असून त्यांचे ५ लाख फॉलोअर्स आहेत. त्यांनी जुलै २०१४ मध्ये ट्विटर खाते सुरू केले होते आणि वर्षभरातच फॉलोअर्सचा आकडा ५ लाखांवर पोहोचला आहे. पंतप्रधान मोदींचे ट्विटरवर ६० लाख ८० हजार फॉलोअर्स आहेत.

दरम्यान, गृहमंत्र्यांच्या वैयक्तिक ट्विटर खात्यावर १६ लाख फॉलोअर्स आहेत. अधिकृत खात्यावरून राजनाथ सिंह दररोज गृहमंत्रालयाशी संबंधित धाेरण, विविध उपक्रम तसेच छायाचित्रे शेअर करत असतात. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटरवर ३.८२ लाख, रेल्वे मंत्रालयाचे ३.९६ लाख, माहिती प्रसारण मंत्रालयाचे ३.८० लाख आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर खात्यावर १.७७ लाख फॉलोअर्स आहेत. मात्र, अर्थ मंत्रालयाचे फक्त ४५ हजारच फॉलोअर्स आहेत.