आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajnaths Facebook Tribute To Bose Angers Family Supporters

राजनाथसिंहांनी FB वर वाहिली नेताजींना \'श्रद्धांजली\', कुटुंबियांकडून माफीची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या कुटुंबियांनी मोदी सरकारचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. राजनाथसिंहांनी नेताजींना फेसबुकवर श्रद्धांजली वाहिली होती. कुटुंबियांचा दावा आहे, की नेताजींचा मृत्यू झाल्याचे पुरावे अद्याप मिळालेले नाहीत, असे असताना देशाचे गृहमंत्री त्यांना श्रद्धांजली कशी काय वाहू शकतात ?
काय आहे वाद
मंगळवारी राजनाथसिंह यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकली. त्यात लिहिले, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 'पुण्यतिथी' निमीत्त सादर नमन ! नेताजींच्या कुटुंबियांनी गृहमंत्र्यांच्या या पोस्टवर आक्षेप घेत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. नेताजींचे नातू चंद्रकुार बोस यांनी राजनाथसिंहांच्या पोस्टवर आक्षेप घेतला आहे. मंगळवारी केलेली पोस्ट बुधावारी दुपारपर्यंत हटवण्यात आलेली नाही.

विमान अपघातात मृत्यू झाल्याचा दावा
22 ऑगस्ट 1945 रोजी टोकियो रेडिओने नेताजी सुभाषंचद्र बोस यांचा 18 ऑगस्ट रोजी विमान अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त दिले होते. नेताजी प्रवास करत असलेले विमान जपानच्या ताब्यातील फोरमोसा (तायवान) भागात कोसळल्याचे म्हटले होते. हे वृत्त ऐकून अनेक भारतीयांना धक्का बसला होता. बंगालमधील जनता कित्येक दशके नेताजी परत येतील या आशेवर होते. 1966 मध्ये नेताजींचे बंधु सुरेशचंद्र यांनी दावा केला होता, की लवकरच सुभाषबाबू जनतेसमोर येतील.
सोशल मीडिया युजर्सकडून गृहमंत्र्यांची कानउघाडणी

- सौरभ भगवती म्हणाले - जेव्हा तुमचे सरकार नेताजींच्या मृत्यूबाबतची कागदपत्रे सार्वजनिक करतील, ती नेताजींना खरी श्रद्धांजली ठरले.

अनुज धर - नॉट अॅक्सेप्टेबल

राज पटेल - मी ऐकले आहे ते अजून जिवंत आहेत, मग त्यांना श्रद्धांजली कशी काय वाहिली जात आहे.

नंद राज - आणि जर ते जिवंत असतील तर ?

उदय मिश्रा - मा. सिंह साहेब. तुम्ही एक बुद्धीमान नागरिक देखील आहात. नेताजींच्या मृत्यू बद्दल तुम्हाला खरीखूरी माहिती आहे का ? असेल तर एक जबाबदार मंत्री म्हणून तुम्ही जनतेला त्याबद्दल सांगितले पाहिजे.